सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील अलीकडेच सुरू झालेली इंडियावाली माँ ही मालिका एका आई आणि मुलाच्या सुंदर वाटचालीचे चित्रण करते. रोहन आणि काकू यांच्या नात्यातही चढ उतार हे असतीलच पण, जेव्हा रोहनला मदतीची गरज असेल, तेव्हा एक भक्कम आधार म्हणून त्याच्या पाठीशी उभे राहताना त्याची आई मागे पुढे पाहणार नाही.

एका आईच्या आपल्या मुलाबद्दलच्या प्रेमाविषयी ही मालिका आहे. अक्षय म्हात्रे हा टेलिव्हिजनवरील सुपरिचित अभिनेता मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तो साकारत असलेली भूमिका एका स्वच्छंदी मुलाची आहे, जो स्वावलंबी आहे.

रोहनची भूमिका करण्याबद्दल अक्षय म्हणतो, “इंडियावाली माँ माझ्यासाठी विशेष आहे. माझ्या घरापासून हे शूटिंगचे लोकेशन ५० किमी दूर असल्यामुळे मी नायगावला मुक्काम हलवला आहे. जेणे करून प्रवासात वाया जाणारा वेळ मी सरावासाठी वापरू शकेन आणि भूमिकेला शंभर टक्के न्याय देऊ शकेन.”

इंडियावाली माँ दररोज सोमवार ते शुक्रवार रात्री 8.30 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होईल.