News Flash

फॉलोअर्सची संख्या दहा लाखापर्यंत पोहोचली, पाठकबाई चाहत्यांना म्हणाल्या ‘थँक्यू’

अक्षया देवधरला दुहेरी आनंद

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अक्षया देवधर सध्या दुहेरी आनंदात आहे. एकाबाजूला लॉकडाउनमुळे मागच्या तीन-साडेतीन महिन्यांपासून बंद असलेले मालिकेचे चित्रीकरण सुरु झाले आहे, तर दुसऱ्या बाजूला इन्स्टाग्रामवर अक्षयाच्या फॉलोअर्सची संख्या वाढतेय.

सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या इन्स्टाग्रामवर अक्षयाच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल दहा लाखापर्यंत जाऊन पोहोचली आहे. अक्षयाने याबद्दल इन्स्टाग्रामवरुनच तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. “जेव्हा मी इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केले, तेव्हा फॉलोअर्सची संख्या इथपर्यंत येऊन पोहोचेल, याची मी कल्पनाही केली नव्हती. मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. तुम्ही जे प्रेम, पाठिंबा दिलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. सुरक्षित रहा, आनंदी रहा, सकारात्मक रहा, आणि तुझ्यात जीव रंगलाचेही आभार. या मालिकेमुळे हे शक्य झाले” असे अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आल्याने मागच्या काही महिन्यांपासून चित्रपट, मालिका आणि जाहिरातींचे चित्रीकरण बंद करण्यात आले होते. पण महाराष्ट्र सरकारने आता चित्रीकरणाला परवानगी दिली आहे. काल पासून मालिकेचे नवीन भाग प्रक्षेपित होण्यास सुरुवात झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 6:42 pm

Web Title: akshya deodhar say thanks to her fans dmp 92
Next Stories
1 ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेच्या शूटिंगला सुरुवात; टीम झाली भावूक
2 ‘बालवीर’मधील ही अभिनेत्री अभ्यासातही अव्वल; बारावीच्या परीक्षेत केली चमकदार कामगिरी
3 रेखा यांचा करोना चाचणीसाठी नकार; दिलं ‘हे’ कारण
Just Now!
X