News Flash

‘कोणी तरी मला स्पर्श करत असल्याचा भास झाला’, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव

ती न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत असतानाचा हा अनुभव आहे.

alaya f, ghost, new york, alaya f ghost, alaya f new york apartment,
एका मुलाखतीमध्ये अलायाने भीतीदायक अनुभव सांगितला आहे.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि तब्बू यांच्या ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे अलाया एफ. ‘जवानी जानेमन’ या पहिल्यावहिल्या चित्रपटातूव अलायाला एक वेगळी ओळख मिळाली आहे. आता एका मुलाखतीमध्ये अलायाने भीतीदायक अनुभव सांगितला आहे.

नुकतीच अलायाने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने न्यूयॉर्कमध्ये राहात असतानाचा अनुभव सांगितला आहे. ‘जेव्हा मी न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत होते तेव्हा राहात असलेल्या अपार्टमेंटमध्ये मला विचित्र अनुभव आले. मला मध्य रात्री कोणाच्या तरी चालण्याचा आवाज यायचा. कित्येक वेळा माझ्या बाथरुममधील शॉवर अपोआप सुरु व्हायचा. अशा अनेक गोष्टी घडत होत्या. नंतर मला असे वाटले की वीज प्रवाह कमी जास्त होत असल्यामुळे हे सर्व होत आहे’ असे अलाया म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by ALAYA F (@alayaf)

आणखी वाचा : ‘मराठी मुलगा भेटला नाही का लग्न करायला?’, यूजरचा प्रश्न पाहून सोनालीला आले हसू, म्हणाली…

पुढे ती म्हणाली, ‘मला त्यावेळी काही दिसले नव्हते. पण मला सतत माझ्या आजूबाजूला कोणी तरी आहे असा भास व्हायचा. कोणी तरी मला स्पर्श करत आहे असे मला जाणवत होते. काही तरी गडबड असल्याचे मला जाणवले. त्यानंतर मी खूप घाबरले होते. मी त्या घरात परत जाण्यास तयार नव्हते.’

दरम्यान अलायने लॉकडाउनमुळे काही चित्रपट गमावले असल्याचे देखील सांगितले. काही दिवसांपूर्वी तिचा ‘आज साजेया’ हा म्यूझिक अल्बम लाँच झाला होता. या अल्बमध्ये ती एका नवरीच्या लूकमध्ये दिसत होती. तिचा हा लूक चर्चेत होता. तसेच अलायाने काही दिवसांपूर्वी करोना लसीचा पहिला डोस घेतला. लस घेतानाचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 3:37 pm

Web Title: alaya f talk about weired experience in her new york apartment avb 95
Next Stories
1 Rajmata Jijabai Death Anniversary 2021: पडद्यावरील ‘जिजाबाई’
2 अक्षय कुमारमुळे ट्विंकल खन्नाला झाली होती अटक; चारचौघांत करायला लावलं होतं ‘ते’ कृत्य
3 ‘चोली के पीछे…’ गाण्याच्या वेळी सुभाष घई यांची मागणी ऐकून नीना गुप्ता यांना वाटली होती लाज
Just Now!
X