News Flash

‘या’ सिनेमात सलमान खान साकराणार १८ वर्षांच्या मुलाची भूमिका

सलमानला फार मेकअप करणं आवडत नाही

सलमान खान

सुलतान आणि टागयर जिंदा है या सिनेमांनंतर अली अब्बास जफर ही हीट जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. सलमान लवकरच ‘भारत’ या सिनेमात दिसणार आहे. अतुल अग्निहोत्रीची निर्मिती असलेल्या या सिनेमात सलमान पुन्हा एकदा अॅक्शन सीन करताना दिसणार आहे. या सिनेमात दबंग खान १८ वर्षांच्या मुलाची भूमिका साकारणा आहे. १८ वर्षाच्या मुलापासून ते ७० वर्षाच्या वृद्धापर्यंतच्या व्यक्तिरेखा तो या सिनेमात साकारणार आहे. अब्बासच्या टीमने या सिनेमावर काम करण्यास सुरूवातही केली.

सिनेमाच्या संहितेबद्दल बोलताना अली म्हणाला की, ‘सिनेमाची संहिता लिहून पूर्ण झाली आहे. या सिनेमात सलमानचा लूक मैंने प्यार कियामधील प्रेमसारखा दिसेल. या लूकसाठी खास व्हीएफक्सचा वापर करण्यात येणार आहे. शाहरुखच्या ‘फॅन’ सिनेमासाठी ज्या टीमने व्हीएफक्स केले होते, त्याच टीमकडे सलमानसाठी काम करण्यास दिले आहे. सलमानला फार मेकअप करणं आवडत नाही. त्यामुळेच आम्ही दुसऱ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यावर काम करत आहोत. फार प्रामाणिकपणे व्हीएफक्सवर काम केले जाईल. यामुळे फार मेकअपची गरज पडणार नाही. सलमान आधीपासूनच हँडसम आहे. फक्त त्याला या काळात वजन कमी करावं लागेल. त्यामुळे सध्या सलमान ४ आठवड्यांमध्ये १० वर्ष लहान दिसण्यासाठी सलमान फार मेहनत घेत आहे.’

दरम्यान, वाल्मिकी समाजाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने अभिनेता सलमान खान आणि शिल्पा शेट्टीला राजस्थान पोलिसांनी समन्स बजावले आहेत. राजस्थानच्या चुरु जिल्ह्यातील पोलीस उपअधीक्षक हुकुम सिंह यांनी हे समन्स बजावले आहेत. सलमान आणि शिल्पासोबत चित्रपट विश्लेषक कोमल नाहटा यांनाही समन्स बजावण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 6:27 pm

Web Title: ali abbas zafar and atul agnihotri next movie bharat salman khan will appear in new look of maine pyar kiya prem with special technology
Next Stories
1 प्रकाश राज यांच्या कार्यक्रमानंतर भाजप कार्यकर्त्यांनी स्टेजवर गोमूत्र शिंपडले
2 आणखी एक सेलिब्रिटी जोडपे होणार विभक्त
3 या दोन स्पर्धकांना विकास गुप्ता देणार बक्षिसाची रक्कम
Just Now!
X