News Flash

…म्हणून छोटी भूमिका असूनही दिशानं दिला चित्रपटाला होकार

बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून आपली ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या दिशाला सलमानसोबत काम करण्याची मोठी संधी चालून आली आहे.

दिशा पटानी

कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं. काम हे काम असतं ,अभिनेत्री दिशा पटानीनं आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. सध्या दिशा ‘भारत’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून आपली ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या दिशाला सलमानसोबत आणि अली अब्बास जफारसोबत काम करण्याची मोठी संधी चालून आली आहे त्यामुळे फार वेळ न दवडता तिने लगेचच होकार दिला.

मात्र दिशाच्या वाट्याला आलेली भूमिका लहानच आहे. पण, चित्रपटाची कथा ऐकून तिनं होकार भरला असं अली अब्बास जफार यांनी म्हटलं आहे. दिशा लहान भूमिकेसाठीही फार मेहनत घेत आहे. तिनं चित्रपटला होकारदेण्याआधी मी तिला चित्रपटाची कथा ऐकवली. मात्र भूमिकेबद्दल फार विचार न करता केवळ कथा ऐकून तिनं होकार दिला असं सांगात अली अब्बास जफार यांनी तिचं कौतुक केलं आहे.

गेल्या वर्षभरात ऐश्वर्यासह अनेक अभिनेत्री चित्रपटातील आपल्या भूमिकेचा विचार न करता केवळ कथा पाहून चित्रपटाला होकार देत आहेत. नुकतंच ऐश्वर्यानंही एका मुलाखतीत याबद्दल आपलं मत मांडलं होतं. चित्रपटाची कथा उत्तम असेल तर चित्रपटात लहानही भूमिकाही करायला माझी काही हरकत नाही असं ती म्हणाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 11:28 am

Web Title: ali abbas zafar reveals disha patani signed salman khans bharat irrespective of her part
Next Stories
1 झी मराठीवरील बाजी मालिकेत येणार नवा ट्विस्ट!
2 माझ्या सर्व चित्रपटांवर बंदी आणा- ट्विंकल खन्ना
3 मेगन- प्रिन्स हॅरीसारखंच प्रियांका-निकचंही ‘रॉयल’ फोटोशूट
Just Now!
X