मिर्झापूरचा गुड्डू म्हणजेच अभिनेता अली फैजलने सोशल मीडियावरील कन्टेट क्रिएटर्सना चांगलाच दम भरला आहे. सोशल मीडियावर आपणही एखादा भन्नाट व्हिडीओ शेअर करावा यासाठी अली फैजलने एक प्रयत्न केला मात्र त्याचा हा प्रयत्न चांगलाच फसला आहे.

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळतात. या ट्रेंडमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी होत असतात. अभिनेता अली फैजल यानेदेखील ट्रेंडिग व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा पहिलाच प्रयत्न फसल्याने त्याने मिर्झापूरमधील रौद्र रुप धारण करत कन्टेट क्रिएटर्सना धमकावलं आहे.

अली फैजलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो फोनवर बोलताना दिसतोय. तर नंतर तो सहज त्याचा फोन भिरकावून देतो आणि याच वेळी त्याचा फोन फुटल्याचं लक्षात येतं. ट्रेंडिग व्हिडीओच्या मोहात अलीचा मोबाईल फुटल्याचं लक्षात येतेयं. प्रयत्न फसला असला तरी त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तो म्हणाला आहे, ” रील आणि ट्रेंडिंग व्हायरल व्हिडीओसाठी माझा प्रयत्न. नुकताच माझा फोन तुटला. धन्यवाद.”

 

View this post on Instagram

 

A post shared by ali fazal (@alifazal9)

फोन फुटल्याचं अलीला मोठं दुख: झालं . त्यानंतर त्याने मिर्झापूरमधील त्याच्या गुड्डूच्या भूमिकेत येत नेटकऱ्यांना चांगलंच धमकावलं आहे. ” या रीलवाल्यांच्या चांगलचं वाजवतो. या भेटा तुम्ही.. रस्त्यावरून उचलून समजवतो. हद्द आहे.” असं कॅप्शन देत त्याने सोशल मीडियावर रील तयार करणाऱ्यांना खडसावलं आहे.

“पलकने मला मारहाण होताना पाहिलंय; “जोडीदाराची निवड चुकली”- श्वेता तिवारीचा खुलासा

अलीचा ट्रेंडिंग व्हिडीओचा प्रयत्न फसला असला तरी त्याने शेअर केलेला त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.चाहत्यांनी अलीला भन्नाट कमेंट दिल्या आहे. एका युजने म्हंटलंय “गुड्डू भय्या रॉकस्”, तर एकाने म्हंटलंय “नोकिया फोन पडला मला वाटलं भूकंप आला.”

अली फैजल लवकरच ‘फुकरे-3’ या सिमेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे.