03 June 2020

News Flash

बॅटमॅन अवतारात अभिनेता फिरतोय घराबाहेर; व्हिडीओ झाला व्हायरल

कोणी ओळखू नये म्हणून अभिनेत्याने घातला बॅटमॅचा पोशाख

करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने देशात २१ दिवसांचे लॉकडाउन जारी केले आहे. यामुळे लोकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. तसेच पोलिसांची नजर चुकवून घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांच्या लाठ्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र अभिनेता अली फजल कोणाचाही पर्वा व नरता लॉकडाउनमध्येही घराबाहेर पडला आहे.

अली का पडला घराबाहेर?

अली फजल बॅटमॅनच्या अवतारात घराबाहेर पडला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन याबाबत माहिती दिली.
“लॉकडाउनच्या काळात घराबाहेर पडणं धोकादायक आहे. मात्र लोकांची मदत करण्यासाठी मी हे धाडसी पाऊल उचललं आहे. गरीब लोकांसाठी आम्ही काही अन्न गोळा केले आहे. ते अन्न मी आता विले पार्ले येथे पोहोचवत आहे.” अशा आशयाची कॉमेंट अलीने या व्हिडीओवर केली आहे. या व्हिडीओमध्ये बॅकअराऊंडला “राह में उनसे मुलाकात हो गयी” हे गाणं वाजत आहे.

अलीचा हा बॅटमॅन अवतारातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया आहेत. अनेकांनी त्याच्या धाडसाचे कौतुक केले आहे. तसेच काही लोकांनी त्याला सुरक्षित राहण्याचा सल्ला देखील दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2020 3:11 pm

Web Title: ali fazal turns into batman helps people in desperate need for food mppg 94
Next Stories
1 Coronavirus : लता मंगेशकर यांची ‘लाख’मोलाची मदत
2 Video : सिद्धार्थ जाधवची टिकटॉकवर एंट्री; पहिलावहिला व्हिडीओ पत्नीसोबत
3 Coronavirus : करोना कनिकाची पाठ सोडेना; पाचव्यांदा रिपोर्ट पॉझिटिव्ह
Just Now!
X