18 April 2019

News Flash

आलिया व माधुरी दीक्षित यांच्यात ‘कलंक’मध्ये रंगणार जुगलबंदी

या गाण्याच्या चित्रीकरणासाठी संपूर्ण टीम तयार झाली आहे.

माधुरी दीक्षित, आलिया भट्ट

माधुरी दीक्षित नुसतं नाव जरी उच्चारल तरी बोलके डोळे, मधुर हास्य, कमरेचे लटके-झटके, थिरकती पावलं, अंगात प्रचंड ऊर्जा आणि मोहक चेहरा डोळ्यासमोर येतो. ‘एक दो तीन…’, ‘धक-धक करने लगा’, ‘मार डाला’, ‘के सरा सरा’, ‘हमारी अटरीया…’ सारख्या अनेक गाण्यांवर तिने विविध प्रकारचं नृत्य चंदेरी पडद्यावर सादर केलं. तिचं नृत्य पाहणं चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. कदाचित हाच विचार करत निर्माता- दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या आगामी ‘कलंक’ या बिग बजेट चित्रपटात माधुरीसोबत आणखी एका अभिनेत्रीची नृत्य जुगलबंदी प्रेक्षकांना दाखवणार आहे.

या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट माधुरीसोबत एक गाणं शूट करणार आहे. त्यासाठी ती गेल्या काही दिवसांपासून धकधक गर्लकडून कथ्थकचं प्रशिक्षण घेत आहे. या गाण्यात माधुरी आणि आलिया यांच्या नृत्याची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. या गाण्याच्या चित्रीकरणासाठी संपूर्ण टीम तयार झाली आहे.

वाचा : ‘तारक मेहता..’मध्ये लवकरच परतणार दयाबेन

‘कलंक’मधील या गाण्याच्या शूटसाठी आलिया गेल्या वर्षभरापासून कथ्थक शिकत आहे. मात्र या गाण्यात तिचा सामना माधुरी दीक्षितसोबत होणार आहे. जी नृत्यात निपुण आहे. म्हणूनच गेल्या एक दीड महिन्यापासून ती जास्त मेहनत घेत आहे. आलिया आणि माधुरीला एकत्र नृत्य करताना पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे.

First Published on September 9, 2018 4:03 pm

Web Title: alia bhatt and madhuri dixit to perform a grand kathak sequence in the period drama kalank