News Flash

आलिया भट्ट, रणवीर सिंगच्या ‘गली बॉय’ सिनेमाचे फोटो लीक

आलिया- रणवीरमध्ये कोणत्यातरी कारणांमुळे भांडण झाल्याचे दिसते

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट स्टारर ‘गली बॉय’ सिनेमाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. या सिनेमाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये आलिया आणि रणवीर दोघंही फार वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. मुंबईतील एका झोपडपट्टी परिसरात या सिनमाचे सध्या चित्रीकरण सुरू आहे. आलिया या फोटोंमध्ये हिजाब ओढलेली दिसत आहे. तर रणवीरचा लूक फारच साधा आहे. त्याचा हा लूक पाहून ‘बँड बाजा बारात’ सिनेमातील त्याच्या लूकची आठवण येते.

फोटोंकडे पाहून आलिया आणि रणवीरमध्ये कोणत्यातरी कारणांमुळे भांडण झाल्याचे दिसते. त्यात आलियाचा रागावलेला चेहरा स्पष्ट दिसतो तर रणवीर तिला मनवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या सिनेमात रणवीर आणि आलियासोबत कल्की कोचलिनचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या सिनेमात ती एका रॅपरची भूमिका साकारताना दिसणार आहे.

या सिनेमाच्या नावावरुन तरी सध्या सिनेमाबद्दल कोणतेही अंदाज बांधणे कठीण आहे. झोया अख्तरच्या या सिनेमाच्या निमित्ताने रणवीर आणि आलिया पहिल्यांदाच एका सिनेमात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या दोन्ही कलाकारांचा उत्साह आणि एकंदर त्यांच्या अभिनयाची शैली पाहता त्यांच्या भूमिका हे दोघेही चांगलीच वठवतील यात शंका नाही.

रणवीर सिंगने याआधीही झोया अख्तरसोबत ‘दिल धडकने दो’ या सिनेमात काम केले होते. पण, झोयाच्या दिग्दर्शनात काम करण्याची आलियाची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, दोन्ही कलाकारांच्या कामाचे व्यग्र वेळापत्रक पाहता या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात सिनेमाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 2:46 pm

Web Title: alia bhatt and ranveer singh film gully boy look leak viral
Next Stories
1 ड्रेसवर हजारो डॉलर्स खर्च करण्यापेक्षा वडिलांना मदत कर, मेगनच्या बहिणीने लगावला टोला
2 Breathe trailer : आर. माधवनच्या ‘ब्रीद’ या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित
3 शिक्षणव्यवस्थेचा सामना करण्यासाठी इमरान हाश्मी सज्ज
Just Now!
X