News Flash

‘सडक २’मध्ये आलिया भट्ट साकारणार ही भूमिका

हा चित्रपट २५ मार्च २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

सडक २

कधी काळी बॉलिवूडमध्ये सुपरहिट ठरलेल्या दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या ‘सडक’ चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा काही दिवसांपूर्वी झाली होती. या चित्रपटाद्वारे महेश भट्ट तब्बल २० वर्षानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरणार आहेत. महेश भट्ट यांच्या ‘सडक’ चित्रपटात अभिनेत्री पूजा भट्ट मुख्य भूमिकेत होती आणि आता ‘सडक’च्या सिक्वेलमध्ये देखील पूजा महत्वाची भूमिका साकारणार आहे. पूजा भट्टसह आलिया देखील चित्रपटात झळकणार असल्याचे समोर आले आहे.

सडकच्या सिक्वेलमध्ये आलिया एक आश्रम चालवणाऱ्या धोंगी बाबाची पोल खोलण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या या प्रयत्नांमध्ये अभिनेता संजय दत्त आलियाला मदत करणार असल्याचे म्हटले जात आहे. महेश भट्ट यांच्या या चित्रपटात काम करण्यासाठी सजंय दत्त सज्ज झाला आहे. तसेच तो चित्रपटासाठी फार उत्सुक असल्याचेही म्हटले जात आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. चाहत्यांना पूजा भट्ट आणि आलिया भट्ट या बहिणींच्या जोडीला एकत्र पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.

‘सडक २ हा चित्रपट प्रेम आणि स्वातंत्र मिळवण्याच्या संघर्षावर आधारित आहे. ही खूप सुंदर आणि संवेदनशील अशी कथा आहे’ असे महेश भट्ट म्हणाले. तसेच ९०च्या दशकात ‘सडक’ हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. त्यावेळी चित्रपटात संजय दत्तची भूमिका ३२ वर्षांच्या व्यक्तीची होती आणि आता सडकच्या सिक्वेलमध्ये संजय दत्त ५४ वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. ‘सडक २’ हा चित्रपट २५ मार्च २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने आलिया पहिल्यांदाच वडीलांसोबत काम करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 10:27 am

Web Title: alia bhatt and sanjay dutt starer film sadak 2 details revealed
Next Stories
1 या तारखेला प्रदर्शित होणार ‘PM नरेंद्र मोदी’ चित्रपट
2 प्रियांका, दीपिका, साराने पटकावला ‘इन्स्टाग्रामर्स ऑफ द इअर’चा किताब
3 मतदानाचा हक्क बजावल्यानंतर या कारणामुळे पुष्कर श्रोत्री होतोय ट्रोल
Just Now!
X