14 October 2019

News Flash

आलिया म्हणते, असला नवरा नको गं बाई!

तिचं हे वक्तव्य ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आलिया भट्ट

कलाविश्व म्हटलं की ब्रेकअप-पॅचअपच्या चर्चा या कायमच रंगत असतात. त्यातच सध्या पाहायला गेलं तर बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी लग्नाची गाठ बांधली आहे. त्यामुळे साऱ्यांनाच आता आलिया भट्टच्या लग्नाचे वेध लागले आहेत. परंतु आलिया सध्या तरी लग्नाचा विचार करत नाहीये. मात्र अनेक वेळा तिने लग्नाविषयी जाहीरपणे तिचं मत व्यक्त केलं आहे. यावेळी देखील तिने लग्नाविषयी तिचं मत मांडलं असून तिचं हे वक्तव्य ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील सुपरहिरो असतात. त्यामुळे आपल्या भावी आयुष्याचा जोडीदारही आपल्या वडीलांप्रमाणे असावा असं मुलींना वाटत असत.मात्र आलियाला तिचा होणारा नवरा वडीलांप्रमाणे नसावा असं वाटतंय. आलियाने एका चॅट शोमध्ये स्वत: याविषयी जाहीरपणे सांगितलं आहे

“माझे वडील महेश भट्ट एक उत्तम पिता आहेत. मात्र माझा होणारा नवरा त्यांच्याप्रमाणे नसावा”, असं आलियाने यावेळी म्हटलं. परंतु तिने या वक्तव्यामागचं कारण स्पष्ट केलं नाही.

गोड निरागस हास्याने साऱ्यांना भूरळ पाडणारी आणि तितक्याच ताकदीने भूमिकेला न्याय देणाऱ्या आलियाने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटानंतर तिने ‘गली बॉय’, ‘राझी’, ‘२ स्टेटस’ यासारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आज आलिया तिचा २६ वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहेत.

First Published on March 15, 2019 12:25 pm

Web Title: alia bhatt birthday special know some interesting and unknown facts about her