25 February 2021

News Flash

एका प्रेमाची गोष्ट! रणबीर कपूरच्या इमारतीत आलियाने घेतलं कोटयवधींचं घर

आलियाच्या नव्या घराची किंमत ऐकून व्हाल थक्क!

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ही जोडी सध्या त्यांच्या चित्रपटांपेक्षा अफेअरमुळे सर्वाधिक चर्चेत येत आहे. बऱ्याच काळापासून हे दोघं एकमेकांना डेट करत असून त्यांच्या कुटुंबीयांचीदेखील या नात्याला परवानगी असल्याचं सांगण्यात येतं. लॉकडाउनच्या काळातदेखील या जोडीने त्यांचा बराचसा वेळ एकमेकांसोबत व्यतीत केला. विशेष म्हणजे आता आलियाने रणबीर कपूर राहत असलेल्या इमारतीत घर घेतल्याचं ‘पिंकव्हिला’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

आलियाने रणबीरच्याच इमारतीत एक अपार्टमेंट खरेदी केलं आहे. रणबीर या इमारतीत ७ व्या मजल्यावर राहतो. तर,आता आलिया याच इमारतीत ५ व्या मजल्यावर राहणार आहे. आलियाचं नवीन घर २४६० स्क्वेअर फूटांचं असून त्याची किंमत थक्क करणारी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt (@aliaabhatt)

आलियाने खरेदी केलेल्या नव्या अपार्टमेंटची किंमत तब्बल ३२ कोटी रुपये आहे. ही संपूर्ण इमारत १२ मजल्यांची आहे. ही इमारत कपूर कुटुंबाच्या कृष्णा राज या बंगल्याच्या नजीक आहे. सध्या आलिया तिच्या बहिणीसोबत जुहूमध्ये राहते. मात्र, लवकरच ती या नव्या इमारतीत राहायला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

आलियाने तिचं हे नवीन घर सजवण्याची जबाबदारी शाहरुख खानची पत्नी व इंटेरिअर डिझायनर गौरी खान हिच्यावर सोपवल्याचं सांगण्यात येत आहे. आलियाने या नव्या घरात लक्ष्मीपूजन केलं असून यावेळी तिचे कुटुंबीय, रणबीर कपूर, करण जौहर, अयान मुखर्जी हे उपस्थित होते. यापूर्वी आलियाचा जुहूमध्ये असंच एक अपार्टमेंट असून त्याची किंमत १३.११ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 10:34 am

Web Title: alia bhatt buys apartment worth rs 32 crore ssj 93
Next Stories
1 भूषण प्रधान ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीला करतोय डेट?
2 नवं आव्हान स्वीकारण्यास प्रवीण तरडे सज्ज; ‘या’ चित्रपटातून पहिल्यांदाच हाताळणार प्रेमकथा
3 मराठीतही ‘सर सर सरला’
Just Now!
X