आपल्या सिनेमांसाठी आलिया भट्ट नेहमीच चर्चेत असते. पण यावेळी ती कोणत्या सिनेमासाठी नाही तर चक्क तिच्या गाडीसाठी चर्चेत आली आहे. नुकतीच तिने एक नवीन गाडी खरेदी केली आहे. भारतातील महागड्या गाड्यांपैकी एक गाडी तिने स्वतःसाठी खरेदी केली आहे.

जगभरात लग्झरी गाड्यांची विक्री करणारी कंपनी रेंज रोवरची नवीन गाडी तिने विकत घेतली आहे. रेंज रोव्हर कंपनीची एसयूव्ही ‘वोग’ ही गाडी तिने विकत घेतली आहे. या गाडीची किंमत वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल यात काही शंका नाही. आलियाने या गाडीसाठी तब्बल २ कोटी रुपयांची किंमत मोजली आहे. दिल्लीमध्ये या गाडीची एक्स शोरुम किंमत १. ८८ कोटी रुपये आहे. आतापर्यंत आलिया ऑडीची ‘क्यू ५’ ही गाडी वापरत होती. आलियाने घेतली ही गाडी अभिनेता रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्याकडेही आहे.

या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे गाडीला लांब व्हीलबेस आहेत. तसेच या गाडीत मागच्या बाजूला बसणाऱ्या व्यक्तींना ऐसपैस बसता येणार आहे. पाठीमागे बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ८ ते १० इंचाची स्क्रीन देण्यात येणार आहे. या गाडीचा टॉप स्पीड २१० किमीप्रती तास आहे. तसेच कारमध्ये २० इंचाचे अलॉय व्हील, अॅडजस्ट होऊ शकतील असे लेदर सीट, मूड लायटिंग, क्लायमेट कंट्रोल आणि ऑडियो सिस्टमसारख्या सुविधा आहेत. गाडीत १० इंचचे इन्फोटेनमेंट सिस्टिमही आहे. या सिस्टिममध्ये अनेक अद्यावत सुविधाही आहेत.

या गाडीत ३ लिटर व्ही६ टर्बो डिझेल इंजिन आहे. हे इंजिन २४० बीएचपीची पॉवर आणि ६०० एनएमचे टॉर्क जनरेट करतो. इंजीनला ८- स्पीड ऑटोमॅटिक टान्समिशनशी जोडले गेले आहे.