21 September 2020

News Flash

Koffee with Karan : आलियासोबत रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडची करण घेणार शाळा

अभिनयाव्यतिरिक्त या दोघींमध्ये एक समान दुवा आहे तो म्हणजेच रणबीर कपूर होय.

करण -आलिया

‘कॉफी विथ करण’च्या नव्या सिझनमध्ये सेलिब्रिटी गेस्ट कोण येणार याची उत्सुकता आता संपली आहे. करण आपल्या नव्या सिझनमध्ये बॉलिवूडच्या दोन आघाडीच्या अभिनेत्री आलिया भट्ट आणि दीपिका पादुकोन यांची मुलाखत घेणार आहे. या दोघीही आघाडीच्या अभिनेत्री असल्या तरी अभिनयाव्यतिरिक्त या दोघींमध्ये एक समान दुवा आहे तो म्हणजेच रणबीर कपूर होय.

काही वर्षांपूर्वी रणबीर-दीपिकाला डेट करत होता. रणबीरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या दीपिकानं स्वत:च्या मानेवर त्याच्या नावाचा टॅटूही गोंदवून घेतला होता. मात्र या दोघांचं प्रेम शेवटपर्यंत टिकलं नाही. मात्र ब्रेकअपनंतरही दीपिका रणबीरमधली मैत्री अजूनही टिकून आहे. तर दुसरीकडे रणबीर आलिया भट्टला डेट करत आहेत. हे दोघंही लवकरच विवाहबंधनात अडकणार अशाही चर्चा आहेत.

त्यामुळे ‘कॉफी विथ करण’च्या नव्या सिझनमध्ये रणबीरची प्रेयसी आलिया भट्ट आणि एक्स गर्लफ्रेंड दीपिका पादुकोन यांना एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुकही आहे. करण जोहर आपल्या खास शैलीतून या दोघींकडून रणबीरबद्दल अनेक गोष्टी उलगडून घेणार अशी चर्चा आहे त्यामुळे नव्या सिझनच्या पहिल्यावहिल्या भागाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. करणनं ट्विट करत पहिल्या भागात नारीशक्ती पाहायला मिळणार अशी माहिती दिली.

विशेष म्हणजे दीपिका ही रणबीरची पूर्वीश्रमीची प्रेयसी असली तरी आलिया आणि दीपिकात मैत्रीचं नात आहे. नुकत्याच करण जोहरच्या घरी आयोजीत करण्यात आलेल्या पार्टीत रणवीर-दीपिका, रणबीर- आलिया हे चौघंही उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 5:00 pm

Web Title: alia bhatt deepika padukone are first guests on koffee with karan 6
Next Stories
1 Video : मोठया पडद्यावर येतोय मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार ‘आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर’
2 तनुश्री दत्ताला नाना पाटेकर पाठवणार कायदेशीर नोटीस
3 रणबीर, राज कपूर आणि सोन्याचं नाणं; वाचा हा खास किस्सा
Just Now!
X