News Flash

माझ्यात आणि कतरिनामध्ये सारं काही अलबेल -आलिया

आलिया आणि रणबीर रिलेशनमध्ये येण्यापूर्वी रणबीर आणि कतरिना एकमेकांना डेट करत होते.

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा जुन्या झाल्या आहेत. मात्र असं असलं तरी सुद्धा रणबीरची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफ आणि आलिया या दोघींमध्ये सतत कॅटफाईट सुरु असल्याच्या चर्चा अनेक वेळा रंगताना दिसतात. मात्र या चर्चांवर पहिल्यांदाच आलियाने तिचं मत मांडलं आहे. विशेष म्हणजे आमच्यामध्ये कोणतेही वाद नसल्याचं ती म्हणाली.

आलिया आणि रणबीर रिलेशनमध्ये येण्यापूर्वी रणबीर आणि कतरिना एकमेकांना डेट करत होते. मात्र काही कारणास्तव यांच्या नात्यामध्ये दुरावा आला. त्यानंतर रणबीरचे आलियाबरोबर सुत जुळले. इतकंच नाही तर त्यांचं नातं दोघांच्या घरातल्यांनीही मान्य केलं आहे. परंतु आलिया-रणबीरच्या नात्यामुळे दुखावलेल्या कतरिनाने आलियाबरोबर अंतर बाळगण्यास सुरुवात केल्याचं सांगण्यात आलं. याच उदाहरण म्हणजे आलियाने पोस्ट केलेल्या फोटोला कतरिनाने लाईक केलं नव्हतं त्यामुळे या दोघींमध्ये कॅटफाईट सुरु झाल्याच्या चर्चा रंगायला लागल्या.

दरम्यान,  ‘रणबीरमुळे आमच्या दोघींच्या मैत्रीत फूट पडल्याचं साऱ्यांनाच वाटत आहे. मात्र आम्ही अजूनही चांगल्या मैत्रिणी आहोत. रणबीरमुळे माझ्यात आणि कतरिनामध्ये कोणतेही वाद निर्माण झालेले नाहीयेत. आम्ही आजही चांगल्या मैत्रिणी आहोत. आमच्या विषयी उगाचच काहीही अफवा पसरविल्या जात आहे. मात्र या अफवांमुळे मला काहीच फरक पडत नाही. मी कधी त्यांच्याकडे लक्षही देत नाही. मुळात पसरलेल्या अफवा या उत्तर देण्यासाठी नसतातच. त्यामुळे त्यांच्यावर काही उत्तर देण्याचा संबंधच येत नाही’, असं आलिया म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, ‘मी आणि कतरिना पूर्वीपासूनच एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहोत. आम्ही अनेक वेळा सोशल मीडियावर एकमेकींबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. मात्र कतरिनाने माझ्या एका फोटोवर लाइक न केल्यामुळे साऱ्यांचा गैरसमज झाला आहे. माझा फोटो तिला आवडला नसेल त्यामुळे तिने तो लाईक केल्या नसेल. मात्र याचा अर्थ असा होत नाही की आमच्यात मतभेद आहेत म्हणून ती असं वागली. त्यामुळे मी आत्ता तिला फोन करुन सांगते की माझे फोटो लाईक करणं सुरु कर, मग जेव्हा ती लाईक करेल तेव्हा साऱ्यांचा विश्वास बसेल’.

दरम्यान, कतरिना-आलियाच्या मैत्रीवर उठत असलेल्या प्रश्नांना आलियाने चोख उत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या आलिया तिच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामध्ये व्यस्त असून या चित्रपटामध्ये ती रणबीर कपूरबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 2:14 pm

Web Title: alia bhatt denies cat fight with katrina kaif because ranbir kapoor
Next Stories
1 Bharat teaser : ‘कुछ रिश्ते जमीन से होते है’, सलमानच्या ‘भारत’ची झलक पाहिलीत का?
2 सारा अली खानचं इन्स्टाग्रामवर पदार्पण
3 pataakha Trailer : भारत- पाकिस्तान होणार का एक; ‘पटाखा’मध्ये सख्ख्या बहिणी पक्क्या वैरीणींची कथा
Just Now!
X