‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यामधील मैत्री दृढ झाली आणि हळहळू त्याचं प्रेमात रुपांतर झालं. विविध कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये ते एकत्र दिसू लागले आणि अखेर एका मुलाखतीत त्याने प्रेमाची कबुली दिली. बॉलिवूडमध्ये सध्या ज्या जोडीची जोरदार चर्चा पाहायला मिळतेय, त्या रणबीर कपूर आणि आलिया भट्टविषयीच आम्ही बोलत आहोत. या दोघांच्या डेटिंगच्या बातम्या सध्या जोरात आहे. शनिवारी रणबीर आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत आलियाला पाहिलं गेलं. डिनर डेटवरूनच ते परतत होते.

एकीकडे रणबीर आणि आलिया ‘ब्रह्मास्त्र’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. तर यादरम्यानचा मोकळा वेळ ते एकमेकांसोबत घालवताना पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या वांद्रे इथल्या एका रेस्तराँबाहेर रणबीर- आलियाला पाहिलं गेलं. विशेष म्हणजे यावेळी फक्त रणबीर आणि आलियाच नव्हते, तर रणबीरचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत होते. आई नीतू सिंग, बहिण रिद्धिमा आणि तिची मुलगी असे सगळे त्यांच्यासोबत होते. सोशल मीडियावर सध्या हे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.

सोनम कपूरच्या लग्नात जेव्हा आलिया आणि रणबीरला एकत्र पाहिलं गेलं तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. त्यानंतर ‘राजी’च्या स्क्रिनिंगलाही रणबीर आलियासोबत होता. या दोघांच्या रिलेशनशिपबाबत बरेच तर्कवितर्क लावले जात असतानाच रणबीरने एका मुलाखतीत त्याच्या प्रेमाची कबुली दिली.

Bigg Boss Marathi : ..म्हणून स्मिता आणि आऊमध्ये उडाली वादाची ठिणगी

रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.