‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आलिया भट्ट सध्या यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचली आहे. अवध्या १९व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या आलियाने सध्याच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमध्ये स्थान पटकावले आहे. परंतु आलिया नेहमी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरते. मग तो तिच्या कामाचा भाग असो वा वैयक्तिक जीवन असो. आता तर आलियाने असे काही केले आहे की चाहत्यांनी तिला उचलूनच धरले आहे.

आलियाच्या आयुष्यात वडिल महेश भट्ट आणि मित्र करण जोहरच्या व्यतिरिक्त आणखी दोन व्यक्ती फार महत्वाच्या आहेत. त्यांच्या शिवाय आलिया कोणती कामे करु शकत नसल्याचे तिने कबूलही केले आहे. एक म्हणजे गाडी चालक सुनिल आणि दुसरा तिचा मदतनीस अमोल. आलियाला तिच्या कुटुंबानंतर कोणी महत्वाचे असेल तर हे दोघे.

सुनिल आणि अमोल यांच्यावरील प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी आलियाने तिच्या २६व्या वाढदिवसा निमित्त तब्बल ५० लाखांचा चेक त्यांना भेट म्हणून दिला आहे. तसेच तिने दिलेल्या रक्कमेत त्यांनी मुंबईमध्ये स्वत:ची घरे घ्यावीत असे आलियाला वाटते. सूत्रांनुसार सुनिल आणि अमोलने जुहू आणि खारदांडा येथे १ BHK रुम बुक केला असल्याचे समोर आले आहे.

सध्या आलिया भट्ट तिचा आगामी चित्रपट ‘कलंक’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वरुन धवन, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा आणि कुणाल खेमु हे देखील चित्रपटात झळकणार आहेत. त्यानंतर ती राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटात काम करणार आहे.