News Flash

एक बोट ‘युजलेस’ असल्याचा आलियाला साक्षात्कार!

उजव्या हाताच्या अनामिकेचे काय? ते तर 'यूजलेस' आहे.

बॉलीवूडकरांनी चित्रपटांसाठी टॅटू काढणे ही काही नवीन बाब नाही. दीपिका पदुकोण, शाहिद कपूर, वरुण धवन यांनी आपल्या चित्रपटासाठी टॅटू काढले होते. त्यानंतर आता आलियादेखील या पंक्तीत आली आहे. आगामी ‘शानदार’ चित्रपटासाठी तिने हाताच्या एका बोटावर ‘यूजलेस’ असे गोंदवून घेतले आहे.
उजव्या हाताच्या अनामिकेवर आलियाने यूजलेस असे गोंदवून घेतले आहे. आणि यामागचे तिचे कारण ऐकून तुम्हाला अजिबात आश्चर्याच धक्का बसणार नाही. ‘नींद ना मुझको आए’ या गाण्याच्या प्रसिद्धीवेळी ती म्हणाली की, जर सूला झाली असेल तर करंगळी दाखवतात, मधले बोट कशासाठी वापरतात ते तुम्हाला चांगलेचं माहित आहे. तर्जनी दिशा दर्शवण्यासाठी वापरली जाते. डाव्या हाताची अनामिका साखरपुड्याची अंगठी घालण्यासाठी वापरतात. पण, उजव्या हाताच्या अनामिकेचे काय? ते तर ‘यूजलेस’ आहे.  आता आलियाच्या या ‘लॉजिक’बद्दल आपण काही न बोललेलेचं बरे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 11:52 am

Web Title: alia bhatt gets useless tattoo for her finger
Next Stories
1 बॉलीवूडचे तिन्ही खान अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत- अमिताभ बच्चन
2 गुलाम अलींचा मुद्दा राजकीय झालायं- अमिताभ बच्चन
3 महानायक अमिताभ बच्चन यांचे प्रसिद्ध संवाद
Just Now!
X