News Flash

ती तर करणची कठपुतळी, कंगनाच्या बोचऱ्या टीकेवर आलिया म्हणते…

कंगनाशी वाद न घालण्यातच शहाणपण आहे हे आलियाच्या लक्षात आलंच असेल

कंगना आणि वाद हे समीकरण काही नवं नाही. आपल्या सडेतोड आणि तितक्याच बोचऱ्या मतांसाठी कंगना ओळखली जाते. बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवर कडाडून टीका करणाऱ्या कंगनानं आपला निशाणा थेट अभिनेत्री आलिया भट्टकडे वळवला आहे. आलियासारख्या अभिनेत्री स्वत:च्या चित्रपटाचे ट्रेलर मला पाठवतात पण जेव्हा पाठिंबा देण्याची वेळ येते तेव्हा त्या कच खातात असं कंगना म्हणाली होती. इतकंच नाही तर आलिया ही करणच्या हातची कठपुतळी बाहुली आहे तिला स्वत:चं मत नसून ती करणच्या डोक्यानेच चालते अशीही बोचरी टीकाही तिनं आलियावर केली होती.

या सगळ्यावर आता आलियानं प्रतिक्रिया न देणं पसंत केलं आहे. ‘मला कंगना अभिनेत्री म्हणून खूपच आवडते. तिचा सडेतोड स्वभावही मला आवडतो आणि त्याचा मी आदर करते. तिनं माझ्याविषयी जे मत मांडलं त्याला मी सर्वांसमोर उत्तर देणार नाही. मी तिच्याशी वैयक्तिक या संदर्भात बोलन.’, असं आलियानं स्पष्ट केलं आहे. ‘माझ्याकडून ती दुखावली गेली पण मी जाणीवपूर्वक तिच्याशी चुकीचं वागले नाही. मी तिची माफी मागायलाही तयार आहे’ असंही आलिया म्हणाली.

‘मी त्यांच्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला यावं, त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन करावं अशी आलियासारख्या मुलींची अपेक्षा असते पण अशा मुली तुमच्या मदतीला मात्र क्वचितच येतात. आलियाला स्वत:चं मत नाही. ती जर अशीच राहिली तर मी तिला बॉलिवूडमधली यशस्वी अभिनेत्री कधीच म्हणणार नाही. जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर ठाम भूमिका घेऊ शकत नाही तर तुमच्या यशाला किंमत उरत नाही हे मी आलियाला सांगितलं असंही कंगना एका मुलाखतीत म्हणाली. त्यानंतर आलिया विरुद्ध कंगना असा वाद रंगला.

मात्र कंगनाशी वाद न घालण्यातच शहाणपण आहे हे लक्षात आलेल्या आलियानं कंगनाच्या कोणत्याच टीकवर प्रतिक्रिया न देण्यात धन्यता मानली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2019 5:57 pm

Web Title: alia bhatt has responded to kangana ranaut comment
Next Stories
1 नाना- अनिल कपूर जोडी पुन्हा दिसणार, ‘वेलकम ३’ आणि ‘वेलकम ४’ही येणार
2 सौंदर्या रजनीकांत दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात, पहा सोहळ्यातले खास फोटो
3 … म्हणून हिमांशसोबत केलं ब्रेकअप, अखेर नेहानं सोडलं मौन
Just Now!
X