News Flash

आलियाने असा जपला नात्याचा बंध

आलियाने दोन पिढीतील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

अभिनेत्री आलिया भट्ट

बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असणारी आलिया भट्ट सध्या चित्रीकरणातून खास वेळ काढून वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये रंगली आहे. बॉलिवू़ड कलाकारांच्या सेलिब्रेशनचा एक वेगळा रंग आलियाने दाखवून दिलाय. आलिया सध्या खास व्यक्तिचा वाढदिवस साजरा करण्यामध्ये दंग आहे. आलियाने या सेलिब्रेशनमधून नातेसंबंधातील आदर्शाचा एक संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. सोशल माध्यमाच्या जगात आई-वडिल आणि मुलांच्या नात्यातील वाढणारे अंतर याच माध्यमातून कमी करता येऊ शकते, असा संदेश आलियाने दिल्याचे दिसते. आलियाच्या जीवनातील ही खास व्यक्ती म्हणजे तिची आजी आहे. ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटाच्या चित्रीकरणातून वेळ काढून आलियाने आजीसाठी खास वेळ दिला. आजीचा ८८ वा जन्मदिवस साजरा करुन आलियाने दोन पिढीतील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

२३ वर्षीय अभिनेत्री आलियाने आपल्या आजीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. माझी आजी ८८ वर्षाची झाली आहे, असे कॅप्शन देत आलियाने हा फोटो इन्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘वाढदिवसाच्या दिवशी आजीने माऊथ ऑर्गन वाजवत गीत गायले. त्यांचे हे संगीत ऐकल्यानंतर माझ्याकडे संगीताचे कौशल्य कसे आले याचे उत्तर मला मिळाले,’ असेही आलियाने पोस्टमध्ये लिहिले आहे. माझ्या आजीचे आयुष्य हे प्रेरणादायी आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि मला समजून घेणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये माझ्या आजीचा समावेश होतो, असा उल्लेखही आलियाने पोस्टमध्ये केला आहे. ‘डिअर जिंदगी’ चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाशिवाय त्यातीलच ‘तम्मा तम्मा…’ या गाण्याने देखील आलिया प्रेक्षकांच्या मनामध्ये उतरल्याचे दिसते.

आलिया, वरुणने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन धक धक गर्ल माधुरीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ९० च्या दशकात गाजललेल्या ‘तम्मा तम्मा’ या गाण्यावर हे दोघेही नाचताना दिसले होते. त्यानंतर या गाण्याचे नवीन व्हर्जन ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ चित्रपटात असल्याचे समोर आले. दरम्यान, त्यांच्या या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. माधुरी दीक्षितने या जोडीला नृत्याचे धडे दिले होते. यावर नृत्य दिग्दर्शक सरोज खान यांची नाराजी दिसून आली होती. माधुरी दीक्षितपेक्षा तिची मास्तर अर्थात फिरोज खान म्हातारी झाल्याचे वाटले असावे म्हणून ‘तम्मा तम्मा…’ गाण्याचे त्यांनी माधुरीकडून धडे घेतले असतील, असे सरोज यांनी म्हटले होते. ‘तम्मा तम्मा..’ या मुळ गाण्यावेळी माधुरी दीक्षितला सरोज खान यांनी नृत्याचे धडे दिले होते.

आलियाच्या आगामी चित्रपटाविषयी बोलायचे तर, ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ हा चित्रपट ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’चा सिक्वल आहे. २०१४ मध्ये आलेला शशांक खैतान दिग्दर्शित ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. तरुणाईने हा चित्रपट अक्षरश: डोक्यावर घेतला होता. त्यामुळे आलियाच्या आगामी चित्रपटाबाबतही तरुणाईमध्ये उत्सुकता नक्कीच असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 3:12 pm

Web Title: alia bhatt is giving relationship goals posted picture with her grandmother
Next Stories
1 काजोल म्हणते, ‘त्या’ नात्याविषयी बोलायला नको
2 क्वीन-नवाबसह ‘रंगून’ गेला ‘कॉफी विथ…’चा खास भाग
3 आयोजकांकडून नेहाला असंवेदनशील वागणूक; स्टेजवरच कोसळले रडू
Just Now!
X