News Flash

आलियाच्या आईचा थेट उद्धव आणि आदित्य ठाकरेंना सवाल; म्हणाल्या, “लस आधी…”

सोनी राजदान यांचे ट्वीट सध्या चर्चेत आहे.

देशात करोना रुग्णसंख्या वाढत असून यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशात सर्वाधिक करोना रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ महाराष्ट्रात आहेत. वाढत्या करोना रूग्णांच्या संख्येमुळे सर्वच नागरिक चिंता व्यक्त करत आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी वाढत्या करोना रुग्णांबाबत चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सवाल केला आहे.

सोनी राजदान यांनी केलेले ट्वीट सध्या चर्चेत आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना टॅग करत, ”१६ ते ४० या वयोगटातील लोक कामासाठी घराबाहेर पडत आहेत. तसेच या वयोगटातील लोक नोकरी, बार, नाईट क्लब (बार आणि नाईट क्लबमध्ये बऱ्याच वेळा मास्क न लावता) अशा ठिकाणी जातात. मला कळत नाही प्रथम त्यांना करोना प्रतिबंधक लस का दिली जात नाही?”‘ असा प्रश्न विचारला आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य सेवा आणि करोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १६ फेब्रुवारीपासून ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांचे लसीकरण सुरु करण्यात आले. त्यानंतर एक मार्चपासून ४५ हून अधिक वय असणाऱ्या पण इतर व्याधी असणाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये करोना टास्क फोर्सचा सल्ला आणि वैज्ञानिक आधारांच्या सहाय्याने काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. त्यापैकी पहिला निर्णय म्हणजे ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना करोनाची लस उपलब्ध होणार आहे, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. आता सोनी राजदन यांनी १६ ते ४० वयोगटातील लोकांना लस का दिली जात नाही असा प्रश्न विचारला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 3:29 pm

Web Title: alia bhatt mother soni razdan advice to cm uddhav thackeray avb 95
Next Stories
1 आमिर खान पाठोपाठ आर माधवनला करोनाचा संसर्ग
2 अभिनेता गुरमीत चौधरीचे बॉलिवूडवर आरोप, म्हणाला दिली जाते ‘अशी’ वागणूक!
3 म्हणून Netflixने ‘बाहुबली: बिफोर द बिगनिंग’च्या प्रदर्शनास दिला नकार
Just Now!
X