एका प्रसिद्ध रेस्टॉरंट सर्व्हरने करोनामुळे आपले प्राण गमावले. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे ते आवडते रेस्टॉरंट सर्व्हर होते. त्यांना निधनानंतर अभिनेत्री आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहित त्यांना श्रद्धांजली वाहिली. या पोस्टसोबत आलियाने त्यांच्यासोबतचा एक फोटोसुद्धा पोस्ट केला. त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी आलिया व रणबीर कपूरने त्यांच्यासोबत हा फोटो काढला होता.

आलियाने लिहिलं, ‘रोनाल्ड डीमेलो यांच्या निधनाचे वृत्त ऐकून फार दु:ख झाले. ते अत्यंत विनम्र होते व त्यांच्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करणारे होते. त्यांनी वाढलेलं जेवण जेवायचं भाग्य अनेकदा मला लाभलं. तुमचा दिवस कसा गेला हे ते नेहमी येऊन विचारायचे. हा फोटो त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी काढला होता. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.’

रोनाल्ड डीमेलो यांनी त्यांच्या ४० वर्षांच्या करिअरमध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग यांसारख्या अनेक सेलिब्रिटींना सर्व्ह केलं होतं.

महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या तीन हजारांच्या पुढे गेली असून हा टप्पा गाठणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे. महाराष्ट्रात करोनाबाधांची संख्या ३ हजार ३२० इतकी झाली आहे. शुक्रवारी राज्यात १८ नवे रुग्ण आढळले. तर दिवसभरात ७ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ३३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी ज्या सात रुग्णांचा मृत्यू झाला त्यातील पाचजण मुंबईचे तर दोघेजण पुण्यातले होते.