News Flash

Raazi Movie Collection Day 7: ‘राजी’ची घौडदौड सुरूच… सात दिवसांत केली एवढ्या कोटींची कमाई

सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन सिनेमाच्या कलेक्शचे अधिकृत आकडेवारी सांगितली आहे

आलिया भट्ट आणि विकी कौशलचा राजी सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून पाठिंबा मिळत आहे. प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळेच सिनेमाने ५० कोटींचा पल्ला पार केला आहे. सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन सिनेमाच्या कलेक्शचे अधिकृत आकडेवारी सांगितली आहे. तरण यांनी ट्विट करत म्हटले की, या सिनेमाच्या कलेक्शनचा आकडा लवकर उतरेल असं वाटत नाही. कोणत्याही अडथळ्याशिवाय हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे.

तरण यांच्या ट्विटनुसार, सिनेमाने शुक्रवारी ७ कोटी ५३ लाख रुपयांची कमाई केली होती, तर शनिवार सिनेमाने ११ कोटी ३० लाख रुपये कमावले. रविवारचे कलेक्शन हे १४ कोटी ११ लाख रुपये इतके होते. सोमवारी सिनेमाच्या मिळकतीत थोडा फरक पडला सिनेमाने ६ कोटी ३० लाखांची कमाई केली. मंगळवारीही साधारण ६ कोटी १० लाख रुपयांचा गल्ला या सिनेमाने कमावला. बुधवारी सिनेमाने ५ कोटी ९० लाख रुपये कमवले तर गुरूवारी सिनेमाने ५ कोटी ३५ लाख रुपयांची कमाई केली. सगळ्यांची बेरीज केली असता या सिनेमाने भारतात आतापर्यंत ५६ कोटी ५९ लाखांची कमाई केली आहे.

सिनेमात आलिया भट्ट आणि विकी कौशलची मुख्य भूमिका आहे. सिनेमात दोघांनी पती- पत्नीची व्यक्तिरेखा साकारली आहे. आलियाची आई सोनी राजदान यांनी सिनेमात आलियाच्या आईचीच भूमिका साकारली आहे. सिनेमाचे दिग्दर्शन मेघना गुलझार यांनी केले आहे. संपूर्ण सिनेमात आलिया आणि विकीच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. तसेच मेघना यांनी ज्या पद्धतीने भारत- पाकिस्तानचा वाद सिनेमात सांभाळला त्या कौशल्याचेही कौतुक केले जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, आलिया आणि सोनी राजदान यांनी सिनेमात मुलीला लग्नाच्या पाठवणीचा जो सीन दाखवण्यात आला तो ग्लिसरीनचा वापर न करता शूट केला आहे. मेघना यांनी याआधी ‘तलवार’, ‘दस कहानियां’, ‘फिलहाल’ आणि ‘जस्ट मॅरिड’ या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 8:26 pm

Web Title: alia bhatt movie raazi got entry in the 50 crore club know the total collection
Next Stories
1 सोनम कपूरने केले रणवीर- दीपिकाच्या लग्नावर शिक्कामोर्तब?
2 बॉबी डार्लिंगचा नवरा गजाआड, अनैसर्गिक सेक्स आणि मारहाणीचा आरोप
3 एकट्या बाईवर समाज ‘अॅव्हेलेबल’चे लेबल सहज लावतो- नीना गुप्ता
Just Now!
X