News Flash

माधुरीसोबत स्क्रीन शेअर करण्याविषयी आलिया म्हणते…

'घर मोरे परदेसिया' या गाण्यात माधुरी, आलियाने स्क्रीन शेअर केली आहे

माधुरीसोबत स्क्रीन शेअर करण्याविषयी आलिया म्हणते…
माधुरी, आलिया

चित्रपट दिग्दर्शक करण जोहरच्या आगामी ‘कलंक’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. करण जोहरच्या वडीलांच स्वप्न असलेल्या या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील तगडी स्टारकास्ट झळकणार आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीच्या चाहत्यांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. सोमवारी या चित्रपटातील ‘घर मोरे परदेसिया’ हे गाणं प्रदर्शित झालं. या गाण्यात आलिया भट्ट आणि माधुरी दीक्षित यांची जुगलबंदी पाहायला मिळाली. या गाण्यात माधुरीसोबत स्क्रीन शेअर केल्याचा अनुभव आलियाने नुकताच सांगितला आहे.

‘घर मोरे परदेसिया’ या गाण्यात आलिया आणि माधुरी यांनी नृत्याचं उत्तमरित्या सादरीकरण केलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या दोघींच्या नृत्याची चर्चा सुरु आहे. याचदरम्यान आलियानेही माधुरीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यासोबतच तिच्यासोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला आहे.

“माधुरी दीक्षित यांचं नृत्यकौशल्य साऱ्यांनाच ठावूक आहे. बॉलिवूडमधील अग्रगण्यच्या नृत्यांगना म्हणून त्यांच्याकडे आजही पाहिलं जातं. त्यांच्या नृत्याची एक खास शैली आहे. डान्स करत असताना त्यांचे हावभावही पाहण्याजोगे असतात. थोडक्यात सांगायचं झालं तर डान्स स्टेप्सपासून ते हावभावापर्यंत त्याचं सगळं काही परफेक्ट असतं. त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्यचं आहे”, असं आलिया म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, “चित्रीकरण असो किंवा डान्सची एखादी स्टेप, त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. प्रत्येक टप्प्यावर त्या मला मार्गदर्शन करत होत्या. डान्स करत असताना स्पिन करणं खूप अवघड होतं. त्यामुळे मला ते जमेल की नाही हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. मात्र या भागाचं चित्रीकरण झाल्यानंतर मी ते परफेक्ट केल्याचं मला माधुरी मॅमने सांगितलं”.

‘कलंक’मध्ये माधुरी दीक्षित, संजय दत्त, आलिया भट आणि वरूण धवन आदित्य रॉय कपूर आणि कियारा अडवाणी अशी तगडीस्टार कास्ट झळकणार आहे. हा चित्रपट १९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र फिल्ममेकर्सने या चित्रपटाच्या तारखेत बदल केला आहे. या निर्णयानुसार ‘कलंक’ आता दोन दिवस आधीच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘कलंक’ १९ नव्हे तर १७ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2019 3:38 pm

Web Title: alia bhatt on ghar more pardesiya with madhuri dixit i was lucky it was not a dance
Next Stories
1 अजय देवगणसह हे कलाकार दिसणार ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात
2 Holi 2019 : बॉलिवूडच्या या मोठमोठ्या होळी पार्ट्या झाल्या बंद, कारण..
3 विकी कौशल-हरलीनचं ब्रेकअप कतरिना नाही तर ‘या’ अभिनेत्रीमुळे?
Just Now!
X