26 August 2019

News Flash

रणबीरसोबत लग्नाची तयारी सुरू; आलियाने सब्यसाचीकडून ऑर्डर केला लेहंगा?

रणबीर आणि आलिया २०२० मध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचं वृत्त आहे

बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. आलिया भट्टने लग्नासाठी प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीला लेहंगा डिझाइन करण्याची ऑर्डर दिली असल्याचं वृत्त ‘स्पॉटबॉय इ’ ने दिलं आहे. आलिया आणि रणबीर २०१८ पासून एकमेकांना डेट करत असून २०२० मध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

‘स्पॉटबॉय इ’च्या सुत्रांनुसार, आलिया भट्टने एप्रिल महिन्यात आपल्या लग्नाच्या लेहंग्यासंबंधी चर्चा करण्यासाठी सब्यसाची मुखर्जीची भेट घेतली होती. यामुळे लग्नाची तयारी सुरु झाली असल्याचं तरी कळत आहे. सब्यसाची मुखर्जीने याआधी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्रा यांच्या लग्नातील कपडे डिझाइन केले आहेत.

आलियाने याआधी अनेक कार्यक्रमांमध्ये सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केलेल कपडे वापरले आहेत. त्यामुळे लग्नासाठीही तिने सब्यसाची मुखर्जीची निवड केली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आगामी ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहेत. काही मुलाखतींमध्ये दोघांनी अनेकदा एकमेकांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. मात्र यावेळी लग्नाच्या चर्चेवर बोलणं त्यांनी टाळलं होतं. याआधी भट्ट आणि कपूर कुटुंब लग्नाची तारीख ठरवण्यासाठी एप्रिल महिन्यात भेटणार असल्याचंही वृत्त आलं होतं.

यादरम्यान एका वृत्तानुसार, ऋषी कपूर पूर्ण बरे होऊन भारतात परतल्यानंतर आलिया आणि रणबीर लग्न करणार असल्याची चर्चा होती. सप्टेंबर महिन्यापासून ऋषी कपूर अमेरिकेत कॅन्सरवरील उपचार घेत आहेत. त्यांच्यावरील उपचार पूर्ण झाले असले तरी ते भारतात कधी परतणार आहेत याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

रणबीर आणि आलिया भट्ट यांचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. अयान मुखर्जीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तसंच आलियाच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘सडक २’ आणि ‘इंशाल्लाह’ यांचा समावेश असून रणबीर कपूर ‘शमशेरा’ चित्रपटात झळकणार आहे.

First Published on July 23, 2019 4:09 pm

Web Title: alia bhatt ordered sabyasachi lehenga for wedding with ranbir kapoor next year reports sgy 87