24 January 2020

News Flash

‘कलंक’च्या टीकाकारांना आलियाचं उत्तर

हा चित्रपट पाहून प्रेक्षकांची पुरती निराशा झाली.

आलिया भट्ट

धर्मा प्रॉडक्शन्सचा बहुचर्चित ‘कलंक’ हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. मात्र हा चित्रपट पाहून प्रेक्षकांची पुरती निराशा झाली. आलिया भट्ट, वरुण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर अशी मोठी स्टारकास्ट असूनही चित्रपट प्रेक्षक-समीक्षकांना भावला नाही. ‘कलंक’ पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर टीकासुद्धा केली. चित्रपटाबाबत प्रेक्षकांचं मत स्वीकारत आलियाने टीकाकारांना उत्तर दिलं आहे.

एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान दिलेल्या मुलाखतीत आलियाला ‘कलंक’च्या टीकांबाबत प्रश्न विचारला. त्यावर ती म्हणाली, ‘मी माझ्या चित्रपटाचं विश्लेषण करणार नाही कारण ते गरजेचं नाही. प्रेक्षकांचं मत हेच चित्रपटासाठी सर्वोच्च स्थानी असतं आणि जेव्हा त्यांच्याकडून चांगल्या प्रतिक्रिया येत नसतील तर कदाचित चित्रपटात कमतरता असेल. आपण हे स्वीकारलं पाहिजे आणि पुन्हा प्रयत्न केले पाहिजे. पुढच्या वेळी याहून दमदार कामगिरी करत त्यांची निराशा दूर केली पाहिजे.’

याआधी आलियाच्या ‘राजी’ आणि ‘गली बॉय’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर दमदार कामगिरी केली होती. ‘कलंक’मधील तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. मात्र चित्रपटाची पटकथा आणि त्याची मांडणी चुकली असं प्रेक्षकांचं मत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने या चित्रपटाला ‘निराशाजनक’ असं म्हटलं. तरीसुद्धा बॉक्स ऑफीसवर चित्रपटाची कमाई चांगली होताना दिसत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 66.03 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. मात्र या आठवड्यात नवीन चित्रपट बॉक्स ऑफीसवर दाखल होताच ‘कलंक’ला चांगलाच फटका बसेल अशी शक्यता आहे.

 

First Published on April 23, 2019 9:18 am

Web Title: alia bhatt reacts to kalank criticism
Next Stories
1 Video : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त सईने केलं श्रमदान करण्याचं आवाहन
2 निवडणूक लढवण्याबाबत अक्षय म्हणतो…
3 दिवंगत सदाशिव अमरापूरकरांचा वारसा जपण्यासाठी लेकी सज्ज, ‘पुरुषोत्तम’ चित्रपटातून करणार कलाविश्वात पदार्पण
Just Now!
X