23 September 2020

News Flash

Video : रणवीर-आलियाच्या ‘गली बॉय’चा प्रोमो प्रदर्शित

या प्रोमोमधील आलिया -रणवीरचे संवाद लोकप्रिय झाले आहेत.

गली बॉय

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर गली बॉय हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामधून रॅपर्सच्या दुनियेत नावलौकिक मिळविणाऱ्या डिवाईन म्हणजे विवियन फर्नांडिस आणि रॅपर नॅझी म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

अभिनेत्री आलिया भट्टने सोशल मीडियावर हा प्रोमो शेअर केला आहे. सध्या या प्रोमोमधील आलिया आणि रणवीरचे संवाद चांगले गाजत आहेत. प्रदर्शित झालेल्या व्हिडिओमधून या दोघांची केमिस्ट्री चांगलीच दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

Tu reply kyu kiya???? #ApniAlbina #GullyBoy

A post shared by Alia (@aliaabhatt) on

या चित्रपटामध्ये आलिया एका मेडिकल स्टुडंटची भूमिका वठवत आहे. तर रणवीर पहिल्यांदाच एका रॅपरच्या भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे रणवीर आणि आलियासोबतच मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषदेखील झळकणार आहे. या चित्रपटात अमृता रणवीरच्या आईच्या भूमिकेत आहे. झोया अख्तर दिग्दर्शित हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 11:20 am

Web Title: alia bhatt released gully boy dialogue promo
Next Stories
1 Video : दाक्षिणात्य चाहत्यांसाठी मराठमोळ्या सावनी रविंद्रची ‘रोमँण्टीक’ भेट
2 Happy Birthday Abhishek : ‘या’ ८ चित्रपटातून अभिषेकने दाखविली अभिनयाची चुणूक
3 ‘अभिनयाच्या क्षेत्रातील ‘कमांडर’ हरपला’, ट्विटवरून सेलिब्रिटीजने रमेश भाटकरांना वाहिली श्रद्धांजली
Just Now!
X