28 February 2021

News Flash

आलिया म्हणते, आता माझ्या लग्नाची वाट पाहा!

एका अवॉर्ड शोदरम्यानदेखील लग्नाच्या प्रश्नानं आलियाचा चांगलाच पिच्छा पुरवला.

रणवीर- आलिया

बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरू झाल्याबरोबरच अनेकांनी आलिया भट्टलादेखील तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारायला सुरूवात केली आहे. हे प्रश्न अनेकदा आलिया हसण्यावारी घेते. नुकत्याच पार पडलेल्या एका अवॉर्ड शोदरम्यानदेखील लग्नाच्या प्रश्नानं आलियाचा चांगलाच पिच्छा पुरवला. मात्र आपल्या लग्नाची वाट पाहणाऱ्यांना तिनं गंमतीशीर उत्तर दिलं आहे.

रणवीर सिंग दीपिका विवाहबंधनात अडकले आता तुम्ही कधी लग्न करणार? असा प्रश्न आलीयाला विचारला तेव्हा, माझ्या लग्नाची वाट पाहणाऱ्यांनी आणखी वाट पाहा. कथेचा क्लायमॅक्स हा चांगला आणि आनंदी असला पाहिजे. असं उत्तर आलियानं दिलं. आलिया आणि रणबीर कपूर एकमेकांना डेट करत असल्याचं समजताच आलिया रणबीर जिथे जाईल तिथे त्या दोघांनाही लग्नाबद्दल विचारणारे कमी नाही. हे प्रश्न अनेकदा आलिया हसण्यावारी घेते. मात्र यावेळी तिनं सर्वांना थोडं आणखी थांबवण्याचं सुचवलं आहे.

काही महिन्यांपूर्वीच आपण आलियाला डेट करत असल्याचं रणबीरनं एका मुलाखतीत मान्य केलं होतं. रणबीर आणि आलिया दोघंही २०१९ मध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 3:55 pm

Web Title: alia bhatt responds to her wedding rumours with ranbir kapoor
Next Stories
1 करिनाशी लग्नाच्या दिवशी पूर्वाश्रमीची पत्नी अमृताला लिहीलं होतं पत्र- सैफ
2 Video : ‘बेखबर कशी तू’ सोशल मीडियावर हिट
3 दीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप
Just Now!
X