News Flash

 गंगूबाई.. तेलुगूतही!

गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट तेलुगूतही प्रदर्शित करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे.

दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा ‘बाहुबली’ हिंदीतही प्रदर्शित झाला. जगभर कमाई करून डंका वाजवलेल्या या चित्रपटाने के वळ प्रभाससाठीच हिंदी चित्रपटसृष्टीची दारे उघडली असे नाही, तर अनेक दाक्षिणात्य कलाकार आता त्याच्या पावलावर पाऊल टाकत हिंदीत येऊ लागले आहेत. हे कमी होते की काय म्हणून आता अलिया भट्ट, अजय देवगण, संजय दत्तसारखे बॉलीवूडचे कलाकार दाक्षिणात्य चित्रपटांतून लोकांसमोर येणार आहेत. आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिलेली दक्षिणेकडची बाजारपेठही जोडून घेण्याचा प्रयत्न आता बॉलीवूडच्या निर्मात्यांकडून के ला जातो आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट तेलुगूतही प्रदर्शित करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. या निर्णयामागेही बाजारपेठेचे हे गणित फार महत्त्वाचे आहे.

धर्मा प्रॉडक्शनने ‘बाहुबली’ या हिंदी भाषेतील चित्रपटाचे वितरण आपल्या हातात घेतले होते. त्यानंतर हिंदी भाषिक प्रेक्षकांची बाजारपेठ मिळवण्याच्या दृष्टीने दाक्षिणात्य चित्रपटही हिंदी भाषेत डब करण्याचा सिलसिला मोठय़ा प्रमाणावर सुरू झाला. आजघडीला दाक्षिणात्य चित्रपटांची आणि कलाकारांची बाजारपेठ किती मोठी होऊ पाहाते आहे हे वेगळे सांगायला नको. आता हाच प्रयत्न बॉलीवूडमधूनही सुरू झाला आहे. अलिया भट्ट ‘बाहुबली’ फे म दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या आगामी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिके त दिसणार आहे. त्याआधी अलिया दक्षिणेत पोहोचावी या उद्देशाने ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट आता तेलुगू भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाची पहिली झलकही तेलुगू भाषेत प्रदर्शित करण्यात आली आहे आणि ही झलक तेलुगू भाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठीही वेगवेगळे प्रयत्न के ले जात आहेत.

दाक्षिणात्य अभिनेता पवन कल्याण यांचा ‘वकीलसाब’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबरोबर ‘गंगूबाई काठियावाडी’ची तेलुगू भाषेतील झलक प्रदर्शित करण्यात आली. आता हा ट्रेण्ड िंहंदीत चांगलाच रुळतो आहे. रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला ‘८३’ हा चित्रपटही हिंदीबरोबरच तमिळ आणि तेलुगू भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 3:22 am

Web Title: alia bhatt s gangubai kathiawadi to release in telugu zws 70
Next Stories
1 ‘तान्हाजी’ मराठीत
2 ‘टकाटक’च्या यशानंतर आता ‘टकाटक २’
3 बॉलीवूड पुन्हा थांबले..
Just Now!
X