24 October 2019

News Flash

आलियाच्या ‘या’ फूटवेअरची होतेय चर्चा, किंमत जाणून व्हाल थक्क!

आलियाने पारदर्शक सॅन्डल परिधान केले आहेत

बॉलिवूड सेलिब्रीटी नेहमी महागड्या वस्तू वापरताना दिसतात. खासकरुन अभिनेत्री लग्जरी ब्रॅन्डच्या शौकीन असतात आणि बऱ्याच वेळा महागड्या कपड्यांसह अनेक महागड्या अॅक्सेसरीज वापरताना दिसतात. या अॅक्सेसरीजमध्ये हॅण्डबॅग, फूटवेअर, सनग्लासेस, घड्याळे आणि इतर गोष्टींचा समोवेश होतो. बॉलिवूडची बेबो करिना कपूर, सोनम कपूर, दीपिका पदूकोण, अनुष्का शर्मा अनेक वेळा महागडे फूटवेअर वापरताना दिसतात. आता या यादीमध्ये बॉलिवूडची क्यूट गर्ल अभिनेत्री आलिया भट्टचा समोवेश झाला आहे.

आलियाचा नुकताच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये आलियाने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला असून त्यावर क्रीम कलरचे सॅन्डल घातले आहेत. या लूकमध्ये आलिया अत्यंत क्यूट दिसत आहे. पण आलियाच्या लूकपेक्षा तिच्या सॅन्डलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आलियाने परिधान केलेल्या या पारदर्शक सॅन्डलची किंमत ऐकून थक्क व्हाल. या सॅन्डलची किंमत तब्बल पन्नास हजार रुपये आहे. आलियाची ही सॅन्डल इटालियन ब्रँड ‘Neous’ची आहे.

सध्या आलिया तिचे आगमी चित्रपट ‘सडक २’, ‘तख्त’ आणि ‘ब्रह्मास्त्र’मध्ये व्यग्र आहे. दरम्यान आलियाचा काही दिवसांपूर्वी डेडलिफ्टिंग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून तिने यात ७० किलोचे वजन उचलल्याचे पाहायला मिळत होते. आलियाच्या फिटनेस प्रशिक्षकाने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करत तिचे कौतुक केले. फिटनेसच्या बाबतीत तिने आतापर्यंत कशाप्रकारे प्रगती केली आहे हेसुद्धा त्याने पोस्टमध्ये लिहिले.

First Published on September 16, 2019 1:31 pm

Web Title: alia bhatt sandal price avb 95