News Flash

गंगुबाई काठियावाडी वादांच्या भोवऱ्यात, आलिया आणि संजय लीला भन्साळीला न्यायालयाने बजावले समन्स

जाणून घ्या सविस्तर

बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सातत्यानं या चित्रपटाला विरोध होत असल्याचे चित्र दिसत आहे. आता अभिनेत्री आलिया भट्ट, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि चित्रपटाचे लेखक यांना मुंबईतील माझगाव न्यायालयाने समन्स बजावले आहे.

मुंबईच्या मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी या सर्वांना २१ मे रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. याचिकाकर्त्यांनी आरोप केला आहे की, ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात त्यांच्या कुटुंबाची बदनामी केली जात आहे. ही याचिका गंगूबाई काठियावाडी यांच्या मुलाने केली आहे. बाबू रावजी शाह असे त्यांच्या मुलाचे नाव आहे. गंगूबाई काठियावाडी यांनी दत्तक घेतलेल्या चार मुलांपैकी एक असल्याचा दावा बाबूने केला आहे. या चित्रपटात तथ्यहीन गोष्टी दाखवण्याता आल्या आहेत. या चित्रपटामुळे माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी होत असल्याचं त्याने या याचिकेत म्हटले आहे. मुंबईच्या मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी या सर्वांना २१ मे रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं आहे.

‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारीत आहे. हुसैन जैदी यांचे हे पुस्तक आहे. या चित्रपटात आलिया भट्ट गंगूबाईची मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याचसोबत अजय देवगण आणि विक्रांत मेसी यांची या चित्रपटात मुख्य भूमिका असणार आहे. हा चित्रपट ३० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 4:11 pm

Web Title: alia bhatt sanjay leela bhansali summoned by mumbai court as gangubai kathiwadi s son files defamation case dcp 98
Next Stories
1 आलियाच्या आईचा थेट उद्धव आणि आदित्य ठाकरेंना सवाल; म्हणाल्या, “लस आधी…”
2 आमिर खान पाठोपाठ आर माधवनला करोनाचा संसर्ग
3 अभिनेता गुरमीत चौधरीचे बॉलिवूडवर आरोप, म्हणाला दिली जाते ‘अशी’ वागणूक!
Just Now!
X