24 February 2020

News Flash

कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आलियाने मागितली ही गोष्ट

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे

बॉलिवूडची क्यूट गर्ल अभिनेत्री आलिया भट्ट आणि कतरिना कैफने अगदी कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवला आहे. आज १६ जुलै रोजी कतरिना तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्या निमित्ताने आलियाने सोशल मीडियावर कतरिना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा आणि कतरिनाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत आलियाने कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘कतरिना तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. अशीच कायम हसत राहा आणि आम्हाल नेहमी बॉडी गोल्स देत रहा’ असे तीने फोटो शेअर लिहिले होते.

कतरिनासाठी वाढदिवस म्हणजे एखाद्या छान ठिकाणी जाऊन आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवणे. तिचा हा वाढदिवस सुद्धा ती असाच साजरा करणार आहे. समाजमाध्यमं आणि ग्लॅमरविश्व दोन्हीचं दडपण घेऊन वावरणं तिला अजिबात आवडत नाही आणि म्हणूनच या दोन्ही गोष्टींपासून ती अंतर राखून आहे.

‘डी.एन.ए’ ला दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली की, “मी या दिवशी खूप मज्जा करते. खरे सांगायचे झाले तर, ही काही एवढी मोठी गोष्ट नाहीये. काही दिवस सुट्टी घेऊन तुमच्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत मज्जा करण्याचा हा दिवस असतो.”

“मला कुटुंबाबरोबर वेळ घालवायला, त्यांच्यात रमायला आवडते. तेव्हा तर मला अगदी साधे कपडे घालून फिरायचीही इच्छा असते. मात्र हल्ली समाजमाध्यमांमुळे ते शक्यच होत नाही. जिथे जाऊ तिथे सतत कॅमेऱ्याची नजर आमच्यावर असते. त्यामुळे इच्छा असूनही तसे राहता येत नाही, वागताना-बोलताना जपून राहावे लागतं” अशी खंतही तिने व्यक्त केली.

First Published on July 16, 2019 4:27 pm

Web Title: alia bhatt share special photo for katrina birthday and make one wish avb 95
Next Stories
1 गुरुपौर्णिमेनिमित्त हृतिक पोहोचला बिहारला, घेतली आनंद कुमार यांची भेट
2 सनीने अमेरिकेत घेतला ‘स्वप्नांचा बंगला’
3 अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’मध्ये झळकणार ‘जब वी मेट’मधील हा अभिनेता
Just Now!
X