12 November 2019

News Flash

Video : अरेरे! करीनाबद्दल बोलताना आलियाच्या तोंडून निघाली शिवी

करीनाबद्दल बोलताना आलियाची जीभ घसरली. पाहा व्हिडीओ...

आलिया भट्ट, करीना कपूर

‘मामी’ (MAMI) या प्रतिष्ठित चित्रपट सोहळ्याला १७ ऑक्टोबरपासून मुंबईत सुरुवात झाली. काही दिवसांपूर्वी या सोहळ्याचा लाँचिंग कार्यक्रम दिमाखदार पद्धतीने पार पडला. यावेळी बॉलिवूडमधील मोठमोठ्या कलाकारांनी हजेरी लावली. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने यावेळी आलिया भट्ट व करीन कपूर या दोन आघाडीच्या अभिनेत्रींची मुलाखत घेतली. पण ही मुलाखत एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली.

या मुलाखतीत करीनाबद्दल बोलताना आलियाची जीभ घसरली. करीना ही इंडस्ट्रीतील तरुण कलाकारांसाठी कशाप्रकारे प्रेरणादायी ठरत आहे हे सांगत असताना चुकून आलियाच्या तोंडून शिवी निघाली. करीनाबद्दल ती म्हणाली, ”तिच्याकडून मला नेहमीच प्रेरणा मिळाली आहे. आधी ज्या अभिनेत्रींचं लग्न व्हायचं त्यांच्या करिअरची गाडी धीम्या गतीना चालायची. पण करीना याला अपवाद ठरली आहे. जिम लूकपासून प्रत्येक गोष्टीत ती सर्वांच्या पुढे असते. इट्स जस्ट फ****!” आलियाच्या तोंडून तो शब्द ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

हे ऐकताच करणसुद्धा तिला मस्करीत म्हणाला, ”मी अशाप्रकारे तुला मोठं केलं का?” जीभ घसरल्यानंतर आलियाची मानसुद्धा शरमेने खाली झाली आणि तिने सर्वांची माफी मागितली.

First Published on October 17, 2019 12:15 pm

Web Title: alia bhatt slips in the f word at mami stage while talking about kareena kapoor ssv 92 2