12 August 2020

News Flash

Video: बॉडीगार्डशी उद्दामपणे वागणाऱ्या आलियावर नेटकरी भडकले

आलियाने तिच्या बॉडीगार्डला दिलेली वागणूक नेटकऱ्यांना पटली नाही आणि त्यामुळेच तिच्यावर टीका होत आहे.

अवघ्या २६व्या वर्षी बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री आलिया भट्ट सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. आलियाच्या ऑनस्क्रीन कामगिरीची प्रशंसा करणाऱ्या चाहत्यांची नजर तिच्या ऑफस्क्रीन वागणुकीवरही तितकीच असते. सोशल मीडियावरील एका व्हिडीओमुळे आलियावर नेटकरी भडकले आहेत. आलियाने तिच्या बॉडीगार्डला दिलेली वागणूक नेटकऱ्यांना पटली नाही आणि त्यामुळेच तिच्यावर टीका होत आहे.

या व्हिडीओमध्ये आलिया गाडीतून बाहेर निघते आणि तिला सुरक्षित घेऊन जाण्यासाठी बॉडीगार्ड पुढे सरसावतो. पण आलिया तिथेच थांबत काहीशा रागाने ‘आधी तुम्ही जा पुढे’ असं त्याला म्हणते. स्वत:च्याच बॉडीगार्डला अशाप्रकारे बोलणं नेटकऱ्यांना रुचलं नसून आलियाला ट्रोल केलं जातंय. ”ही कसली वृत्ती आहे? ते तुझेच बॉडीगार्ड आहेत, त्यांचा आदर कर,” अशा शब्दांत एका युजरने सुनावले. तर ”किती हा उद्धटपणा, चाहत्यांनी तुला प्रसिद्धी दिली आणि तू त्यांच्यासाठी किमान हसू शकत नाही,” अशी टीका दुसऱ्याने केली.

View this post on Instagram

#aliabhatt on location

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

महेश मांजरेकरांच्या मुलीवर मराठी कलाकारही फिदा, वाचा हे कमेंट्स

आलिया नुकतीच ‘आयफा’ या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात अभिनेता सलमान खानसह झळकली होती. हे दोघं संजय लीला भन्साळीच्या चित्रपटात एकत्र काम करणार होते, पण काही कारणांमुळे भन्साळींनी माघार घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 3:32 pm

Web Title: alia bhatt snaps at bodyguard in viral video internet blasts her ssv 92
Next Stories
1 Video : ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’चा ट्रेलर प्रदर्शित
2 Photo : आयफा अ‍ॅवॉर्डमधील ‘या’ तरुणीमुळे होते सलमानची चर्चा
3 आयकर अधिकारी सांगत अभिनेत्रीची फसवणूक; तीन जण अटकेत
Just Now!
X