01 March 2021

News Flash

आलियाच्या चित्रपटाला एकही कट न देता सेन्सॉर ‘राजी’

'राजी' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्यातील गाणी लोकप्रिय झाली आहेत. यातच प्रेक्षकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे.

राजी

कमी कालावधीत सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या आगामी ‘राजी’ या चित्रपटाविषयीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. ‘राजी’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्यातील गाणी लोकप्रिय झाली आहेत. यातच प्रेक्षकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे.

‘जंगली पिक्चर्स’ आणि ‘धर्मा प्रॉडक्शन’अंतर्गत साकारण्यात आलेल्या या चित्रपटाला ब्रिटीश सेन्सॉर बोर्डाने ‘१२ अ’ प्रमाणपत्र दिले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील एकाही सीनला कट देण्यात आलेला नाही. या चित्रपटाला १३८ मिनीटे म्हणजेच २ तास १८ मिनीटांची मंजुरी देण्यात आली आहे.

वाचा : नर्गिसच्या आयुष्यात नव्या नायकाची एंट्री?

‘राजी’ चित्रपटामध्ये आलिया आणि विकी कौशल मुख्य भुमिकेत असून या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. या चित्रपटामधील आलियाने वठवलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीत उतर असून आलियाच्या चाहत्यांमध्ये हा चित्रपट बघण्याची उत्सुकता दिसून येत आहे. ‘राजी’ हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक १९७१च्या पार्श्वभूमीचे असून आलिया यात एका महिला गुप्तहेराची भूमिका पार पाडणार आहे. हा चित्रपट ११ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2018 12:43 pm

Web Title: alia bhatt starrer raazi has been awarded a 12a certification by the british censor boards
Next Stories
1 नर्गिसच्या आयुष्यात नव्या नायकाची एंट्री?
2 PHOTO : अनुष्का, फक्त तुझ्यासाठी…
3 मी माझ्या पत्नीची साथ देणारच, ‘त्या’ वादांनंतर अक्षयने केली ट्विंकलची पाठराखण
Just Now!
X