चाहत्यांना नेहमीच आपल्या लाडक्या कलाकारासोबत छायाचित्र काढण्याची उत्सुकता असते. मग त्या कलाकारासोबत कितीही गर्दी असली तरी केवळ एक फोटो काढण्यासाठी चाहत्यांमध्ये चढाओढ लागते. मात्र बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट हिने आपल्या चाहत्याची ही इच्छा पूर्ण केली आहे.
‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या आलियाचा नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात ती कूल अंदाजात जिम बाहेर येऊन आपल्या चाहत्यासोबत फोटो काढून त्याची इच्छा पूर्ण करताना दिसत आहे. आपल्या आवडत्या कलाकारासोबत फोटो काढल्यामुळे चाहत्याच्या चेह-यावर विलक्षण आनंद झळकल्याचे या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
वाचा : सर्वांच्या मदतीला धावणाऱ्या सलमानला मिळणार कतरिनाचा आधार?
आलियाने आतापर्यंत अनेक चांगले चित्रपट केले असून तिचा आगामी चित्रपट ‘राजी’ ११ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजारने केले आहे. याचे कथानक १९७१च्या पार्श्वभूमीची असून आलिया एका महिला गुप्तहेराची भूमिका पार पाडणार आहे. या चित्रपटामध्ये आलियासह तिची आई सोनी राजदान या देखील स्क्रिन शेअर करणार आहेत. तसेच चित्रपटाचा ट्रेलर १० एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. मेघना गुलजार दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडत असून धर्मा प्रोडक्शन अंतर्गंत हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 23, 2018 5:40 pm