बॉलिवूडची क्यूट गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट. आलिया सध्या तिच्या आगामी प्रोजक्टच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. पण या सर्वातून वेळ काढून आलिया कुटुंबीयांना आणि मित्रमैत्रीणींसोबत वेळ घालवताना दिसते. नुकताच आलियाने मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत बिकिनीमधील फोटो शेअर केला आहे. आलियाने शेअर केलेला हा थ्रोबॅक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

आलियाने तिची जवळची मैत्रीण आकांक्षा रंजनला इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये आलियाने गुलाबी रंगाची बिकिनी परिधान केली आहे. तर आकांक्षाने जांभळ्या रंगाची मोनिकिनी परिधान केल्याचे दिसत आहे. या लूकमध्ये आलिया अतिशय हॉट दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने, ‘वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा यूनिवर्स’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. त्यावर आकांक्षाने रिप्लाय देत ‘तू माझी आहे, आय लव्ह यू’ असे म्हटले आहे.

This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?
Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt (@aliaabhatt)

आलियाने शेअर केलेला फोटो हा मालदिवचा आहे. काही दिवसांपूर्वी आलिया मैत्रीण आकांक्षा आणि बहिण शाहीनसोबत मालदिवला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली होती. तेव्हाचा थ्रोबॅक फोटो तिने आता शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

आलिया भट्ट लवकरच रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ आणि संजय लीला भंसाळी यांच्या ‘गंगूबा काठियावाडी’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच ती ‘जी ले जरा’ , ‘डार्लिग्स’, ‘RRR’ या चित्रपटांमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या ती करण जोहरचा चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’चे चित्रीकरण करत आहे.