‘राजी’ फेम अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या रिलेशनशिपविषयी कला वर्तुळात बऱ्याच चर्चा होऊ लागल्या आहेत. मुख्य म्हणजे या दोघांनीही त्यांच्या नात्याविषयी व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. लवकरच या दोघांची मुख्य भूमिका असलेला ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अनपेक्षितपणे या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या जोडीची ऑनस्क्रीनप्रमाणेच ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं असून आलिया आणि रणबीर काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये परतले आहेत. सध्या हे दोघंही त्यांचा क्वालिटी टाईम व्यतीत करत आहे. त्यातच आलियाने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये रणबीरसोबत असलेल्या नात्यावर विशेष चर्चा केल्याचं पाहायला मिळालं.
“रणबीरसोबत असलेलं माझं नातं, हे रिलेशनशीप नाही तर ती आमच्यातली चांगली मैत्री आहे. मी अगदी प्रामाणिकपणे सांगते हे नातं आहे ते खूप सुंदर आहे. त्यामुळे सध्या मी प्रचंड खूश आहे. मी ताऱ्यांसोबत अवकाशात तरंगत असल्याचा अभास मला होतो”, असं आलिया म्हणाली.
पुढे ती म्हणाली, “आम्ही दोघंही आमची प्रोफेशनल लाईफ पूर्णपणे एन्जॉय करतोय. रणबीर सलग त्याच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे, तर मीदेखील माझ्या कामामध्ये बिझी आहे. सध्या ही अशी परिस्थिती आहे, जिथे एकाच चित्रपटामध्ये तुम्ही आम्हाला एकत्र पाहू शकता. व्यस्त कामातही आम्ही एकमेकांना वेळ देत आहोत आणि हीच एका सुंदर नात्याची खरी ओळख आहे. त्यामुळे आमच्या नात्याला कोणाची नजर लागू नये”.
दरम्यान, या मुलाखतीमध्ये तिने रणबीरसोबतच्या नात्याविषयी विविध गोष्टींवर चर्चा केली. ज्यावेळी आलिया टेन्शनमध्ये असते, त्यावेळी रणबीर तिला यातून कसं बाहेर काढतो हेदेखील तिने सांगितलं. आलिया आणि रणबीर यांची मुख्य भूमिका असलेला ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 26, 2019 11:01 am