28 September 2020

News Flash

Happy Birthday Ranbir Kapoor : आलियाने खास पद्धतीने दिल्या बॉयफ्रेण्ड रणबीरला शुभेच्छा

आलियानं शुभेच्छांचा वर्षाव करत पुन्हा एकदा आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

रणबीर आलिया

रणबीर कपूरच्या वाढदिवसानिमित्तानं आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ही बॉलिवूडमधली ‘क्यूट’ जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रणबीरच्या वाढदिवशी आलियानं इन्स्टाग्रामवर त्याचा फोटो शेअर करत पुन्हा एकदा प्रेमाची कबुली देत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ‘happy birthday sunshine’ असं इन्स्टाग्रामवर लिहित तिनं रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आलिया आणि रणबीर सध्या दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहेत. पहिल्यांदा अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात आलिया आणि रणबीर ही जोडी दिसली. तेव्हापासून रणबीर आणि आलियाच्या नात्याविषयी चर्चा सुरू झाल्या.

View this post on Instagram

Happy Birthday Sunshine 🌞🎂

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt) on

बल्गेरियामध्ये ‘ब्रम्हास्त्र’चे चित्रीकरण सुरू होतं, तेव्हा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी रणबीरनं आलियाला पहिल्यांदा डेटसाठी विचारले होते. काही दिवसांपूर्वी आलियाचा २५ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी रणबीरची आई नीतू कपूर बल्गेरियाला गेल्या होत्या. गेल्या काही महिन्यांत रणबीरच्या कुटुंबियांसोबत अनेकदा वेळ घालवताना आलिया दिसली.

काही महिन्यांपूर्वीच आम्ही दोघंही एकमेकांना डेट करत असल्याची माहिती रणबीरनं ‘जीक्यू’ मासिकाला दिली होती त्यानंतर हे दोघंही पुढील वर्षापर्यंत विवाहबंधनात अडकणार अशीही चर्चा आहे..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 1:37 pm

Web Title: alia bhatt wishing happy birthday to boy friend ranbir kapoor
Next Stories
1 प्रदीप पटवर्धन “मोरूच्या मावशी”ची तिकिटं ब्लॅकमध्ये विकायचे?
2 ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर
3 #URITeaser : ‘ये नया हिंदुस्तान है, ये हिंदुस्तान घर मे घुसेगा भी और मारेगा भी’
Just Now!
X