28 January 2020

News Flash

Photo : ‘माफिया क्वीन’ गंगुबाईच्या लूकमध्ये आलिया

आलियाने फर्स्ट लूकचे दोन फोटो शेअर केले आहेत

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ‘गंगुबाई काठीयावाडी’ या आगामी चित्रपटाची घोषणा केल्यापासून हा चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे. भन्साळी कामाठीपुऱ्यामधील विशेष चर्चिल्या गेलेल्या गंगुबाई यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट मुख्य भूमिकेत झळकणार असून नुकताच तिचा या चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला आहे. हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटामध्ये ‘द मॅडम ऑफ कामाठीपुरा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गंगुबाई यांच्या जीवनाभोवती कथा फिरताना पाहायला मिळणार आहे.गंगुबाई यांना लहान वयातच वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं होतं. येथे आल्यानंतर त्यांचं संपूर्ण जीवन बदलून गेलं. त्या येथील महिलांना आर्थिक मदत करतात, त्यासोबतच त्यांच्या हक्कासाठीही लढा देतात. वेश्याव्यवसाय करत असताना त्यांची अनेक कुख्यात गुंडांसोबत ओळख झाली होती. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. हे सारं काही ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे.

 

View this post on Instagram

 

Here she is, Gangubai Kathiawadi #SanjayLeelaBhansali @prerna_singh6 @jayantilalgadaofficial @bhansaliproductions @penmovies

A post shared by Alia (@aliaabhatt) on

‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटातील आलियाच्या फर्स्ट लूकचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये एका फोटोत ती भिंतीला टेकून बसलेली आहे. यात तिच्या नजरेमध्ये नैराश्य दिसत आहे तर दुसरीकडे तिच्याच बाजूला एक बंदूकदेखील ठेवल्याचं दिसून येत आहे. तसंच तिने आणखी एक ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो शेअर केला आहे. यात तिच्या डोळ्यात राग दिसत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही फोटोमधून आलिया तिच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

Here she is, Gangubai Kathiawadi #SanjayLeelaBhansali @prerna_singh6 @jayantilalgadaofficial @bhansaliproductions @penmovies

A post shared by Alia (@aliaabhatt) on

दरम्यान, हा चित्रपट आलियाच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरणार असल्याचं म्हटलं जातं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती पहिल्यांदाच अशी भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची कथा हुसैन जैदी यांच्या ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. विशेष म्हणजे या चित्रपटसाठी प्रथम प्रियांका चोप्राला दिग्दर्शकांची पसंती असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र आता संजय लीला भन्साळी यांनी आलियाच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. परंतु आलियासोबत कोणता कलाकार स्क्रीन शेअर करणार हे स्पष्ट झालेलं नाही. या चित्रपटाची निर्मिती पेन इंडिया आणि भन्साळी प्रोडक्शन अंतर्गत करण्यात येणार आहे.

First Published on January 15, 2020 10:02 am

Web Title: alia bhatts first look from sanjay leela bhansalis film gangubai kathiawadi ssj 93
Next Stories
1 नील नितीन मुकेशने साकारलेल्या ‘या’ भूमिकेमुळे वडिलांनी धरला होता ६ महिने अबोला
2 नेत्रहीन डॉ. दिव्यांनी गायलं ‘डोळ्यांमदी तुझा चांदवा’
3 Video: सुपरवुमन उर्वशी रौतेला! उचललं १०० किलो वजन
Just Now!
X