News Flash

आलिया भट्टच्या बहिणीला बलात्कार व जीवे मारण्याची धमकी; करणार कायदेशीर कारवाई

शाहिन भट्ट नेटकऱ्यांवर करणार कायदेशीर कारवाई

अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडमधील घराणेशाहीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परिणामी स्टार किड्सवर सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका होत आहे. यामध्ये सर्वांधिक आरोप होतायत ते भट्ट कुटुंबावर. निर्माता महेश भट्ट, अभिनेत्री पूजा भट्ट आणि आलिया भट्ट सोशल मीडिया ट्रोलिंगमुळे वैतागले आहेत. यामध्ये आता आलियाची बहिणी शाहिन भट्ट हिचा देखील सामावेश झाला आहे. तिला देखील सोशल मीडियाद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या मंडळींविरोधात आता ती कायदेशीर कारवाई करणार आहे.

अवश्य वाचा – आणखी एका कलाकाराची आत्महत्या; २७ व्या वर्षी गोळी घालून संपवलं आयुष्य

अवश्य वाचा – टाळ्या-थाळ्या झाल्या, आता डीजे वाजवायचा का?; बॉलिवूड गायकाचा केंद्राला सवाल

 

 

 

शाहिनने एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे सांगितले. “आक्षेपार्ह कॉमेंट करणाऱ्या लोकांविरोधात मी आता आवाज उठवणार आहे. ज्या मंडळींनी मला जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच अश्लिल मेसेज पाठवले, माझ्या कुटुंबियांबाबत गैरवर्तणूक केली अशा मंडळींविरोध मी कायदेशीर कारवाई करणार आहे. त्यांच्या मेसेजचे स्क्रीन शॉट इन्स्टाग्रामला पाठवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहे.” अशा आशयाची पोस्ट तिने केली. तसेच तिने काही नेटकऱ्यांच्या कॉमेंटचे स्क्रीन शॉट देखील पोस्ट केले आहेत. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 1:33 pm

Web Title: alia bhatts sister shaheen shares screenshots of hate messages mppg 94
Next Stories
1 ‘बिग बी व अभिषेकचा उपचारांना चांगला प्रतिसाद’; डिस्चार्ज देण्याबाबत रुग्णालयाची ही माहिती
2 सासूबाईंसाठी प्रियांका चोप्राची ‘घोडदौड’, व्हायरल झाला व्हिडीओ
3 Video : ‘असल तो सिद्दी तर आम्हीबी हाय जिद्दी’; जगजौहरचा टीझर प्रदर्शित
Just Now!
X