28 October 2020

News Flash

पुढच्या चित्रपटासाठी आलियाचा जीममध्ये हार्ड वर्कआऊट

सेलिब्रिटी ट्रेनर यास्मिन कराचीवाला आलियाला प्रशिक्षण देत आहेत

'उडता पंजाब'नंतर आलिया आता पुढील चित्रपटासाठी सज्ज झाली असून, त्याची पूर्वतयारीही तिने सुरू केलीये.

नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘उडता पंजाब’मधील अभिनयाने अभिनेत्री आलिया भटने बॉलिवूडसह अनेक प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. सहकलाकारांसह अनेकांनी आलियाच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. अभिनेत्री करिना कपूरने तर आलियाला या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळायला पाहिजे, असे सांगत तिच्या पाठीवर कौतुकाची थापच मारली.
‘उडता पंजाब’साठी आलिया भटला राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा – करीना कपूर
‘उडता पंजाब’नंतर आलिया आता पुढील चित्रपटासाठी सज्ज झाली असून, त्याची पूर्वतयारीही तिने सुरू केलीये. यासाठी सध्या ती जीममध्ये कठोर परिश्रम घेत असल्याचे पाहायला मिळते. पुढच्या चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी आलिया जीममध्ये जाऊन मेहनत घेत आहे, अशी माहिती मिळालीये. बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांना जीममध्ये प्रशिक्षण देणाऱ्या यास्मिन कराचीवाला याच आलियालाही सध्या प्रशिक्षण देत आहेत. तिच्याकडून दररोज कठोर परिश्रम करून घेतले जात आहेत. खुद्द यास्मिन कराचीवाला यांनीच त्यांच्या ‘इन्स्टाग्राम’ अकाऊंटवर याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आलिया काही व्यायामाचे प्रकार करताना पाहायला मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2016 12:48 pm

Web Title: alia bhatts workout at gym
Next Stories
1 ‘बाजी जितने से है, चाहे प्यादा कुर्बान हो या रानी’, ‘रुस्तम’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
2 विमानावर प्रमोशनचा रजनीकांतच्या ‘कबाली’चा वेगळा फंडा
3 पाहा: दुरदर्शनवर सूत्रसंचालन करतानाचा शाहरूख खान
Just Now!
X