08 December 2019

News Flash

लग्नाआधीच आलियाने ठरवलं बाळाचं नाव

आलिया लवकरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात रणबीरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे

आलिया भट्ट

बॉलिवूडमधील सर्वात फेव्हरेट कपल म्हणून ओळखली जाणारी आलिया-रणबीरच्या अफेअरची चर्चा आता जुनी झाली आहे. मात्र तरीदेखील त्यांच्याविषयीचे प्रत्येक अपडेट वाचायला चाहत्यांना आवडतात. या दोघांच्या नात्याविषयी त्यांच्या घरातल्यांनाही माहित असून रणबीरच्या घरातल्यांनी त्यांना हिरवा कंदीलही दाखविला आहे. मात्र हे दोघंही त्यांच्या अफेअरबद्दल जाहीरपणे बोलणं टाळत असतात. आलिया सध्या तिच्या आगामी ‘गली बॉय’च्या चित्रीकरणात व्यस्त असून तिने एका कार्यक्रमामध्ये तिच्या लग्नानंतरच्या आयुष्याविषयी काही गोष्टींवर चर्चा केली आहे.

काही दिवसांपूर्वी आलियाने एका रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने करिअरसोबतच लग्नानंतरचं तिचं आयुष्य कसं असेल हे सांगितलं. विशेष म्हणजे तिने लग्नापूर्वीच तिच्या बाळाचं नाव ठरविल्याचं तिने सांगितलं.

आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाला अद्याप तरी अवकाश आहे. मात्र लग्नापूर्वीच आलियाने तिच्या बाळाचं नाव ठरविल्याचं  दिसून येत आहे. लग्नानंतर जर मला मुलगी झाली तर मी तिचं नाव ‘अलमा’ ठेवेन, असं आलियाने सांगितलं. गेल्या काही दिवसापासून आलिया-रणबीरच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र अभिनेता ऋषी कपूर यांच्या खालावलेल्या प्रकृतीमुळे या दोघांच्या लग्नाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता.

First Published on February 11, 2019 5:11 pm

Web Title: alia dicide feture baby name
Just Now!
X