24 October 2020

News Flash

भावंडं म्हणत १३ वर्षे लपवलं नातं; समलैंगिक जोडप्याने मुंबईत घर घेत केला खुलासा

समाजात वावरताना त्या दोघांना कोणत्या अडचणी आल्या हेदेखील त्याने सांगितलं आहे

समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर अनेकांनी त्यांच्या नात्यावर उघडपणे भाष्य केलं होतं. यात बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक अपूर्व असरानी यानेदेखील या निर्णयाचं स्वागत केलं होतं. त्यानंतर आता अपूर्वने प्रियकरासोबतचा एक फोटो शेअर करत जाहीरपणे त्यांचं नात सर्वासमक्ष मान्य केलं आहे. विशेष म्हणजे आम्ही भावंडं नसून एकमेकांचे पार्टनर्स आहोत, असं त्याने म्हटलं आहे.

गेल्या १३ वर्षांपासून अपूर्व आणि सिद्धांत एकमेकांना डेट करत असून ते रिलेशनमध्ये असल्याचं त्यांनी मान्य केलं आहे. ही माहिती अपूर्वने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. तसंच समाजात वावरताना त्या दोघांना कोणत्या अडचणी आल्या हेदेखील त्याने सांगितलं आहे.


“गेल्या १३ वर्षांपासून आम्ही एकत्र राहत आहोत. मात्र कायम आम्हाला भावंड असल्यासारखं वावरावं लागत होतो. घर भाड्याने मिळावं यासाठी आम्हाला भाऊ असल्याचं नाटक करावं लागत होतं. तसंच शेजारील लोकांना आमच्या नात्याविषयी कळू नये त्यामुळे कायम आम्हाला घराचे पडदे लावून ठेवायला सांगत असतं. मात्र काही काळापूर्वीच आम्ही दोघांनी स्वत:च घर घेतलं आहे. त्यामुळे आता आम्ही स्वत:हून लोकांना आमच्या नात्याविषयी सांगतो. आम्ही एकमेकांचे पार्टनर आहोत हे बिंधास्त सांगतो. हिच ती वेळ आहे जेव्हा LGBTQ मधील नागरिकांना समाजात वावरण्याचा दर्जा मिळेल”, असं ट्विट अपूर्वने केलं आहे.

अपूर्वने हे ट्विट करण्यासोबतच सिद्धांतसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तसंच त्यांच्या दारावर लावण्यात आलेली नेमप्लेटसुद्धा दाखविण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून अपूर्व आणि सिद्धांत हे दोघं भावंड असल्याचं बॉलिवूडमधील सेलिब्रिटींना वाटत होतं. मात्र अपूर्वने त्यांचं खरं नातं जगजाहीरपणे मान्य केलं आहे. विशेष म्हणजे त्याची ही पोस्ट पाहून अनेकांनी त्याचं कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, अपूर्व कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माता आहे. त्याने ‘सत्या’, ‘शाहिद’, ‘सिटीलाइट्स’, ‘अलिगढ’, ‘सिमरन’ या चित्रपटांचं लेखन केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 11:34 am

Web Title: aligarh writer apurva asrani talks about his relationship with siddhant ssj 93
Next Stories
1 मृत्यूच्या दारात उभा असतानाही इरफान खान करत होता ‘त्यांची’ मदत
2 सोनू सूदच्या कामाचं राज्यपालांकडूनही कौतुक
3 तापसीच्या आजीचं निधन; लॉकडाउनमुळे झालं नाही अंतिम दर्शन
Just Now!
X