News Flash

ग्लॅमगप्पा : अर्जुनच्या तालावर आलियाचं नृत्य

लग्नाच्या मोसमात सध्या आलिया कुठेतरी गायब झाली आहे.

आलिया भट व अर्जुन कपूर

लग्नाच्या मोसमात सध्या आलिया कुठेतरी गायब झाली आहे. मसक्कलीने लागलीच आपले गुप्तहेर आलियाला शोधण्यासाठी पाठवले. तर बाईसाहेब लग्नातच सापडल्या, पण तिच्या मैत्रिणीच्या. आलिया भट सध्या तिची खास मैत्रीण कृपा मेहताच्या लग्नासाठी जोधपूरला गेली आहे. या लग्नात ती खूप धमाल करतेय. आता लग्न म्हटलं की संगीत आणि नाचगाणं आलंच. आपल्या मैत्रिणीच्या या लग्नात आलियाचा खास परफॉर्मन्स होणार आहे. आलियाने इतक्या चित्रपटात काम केलंय आणि त्यात तिच्यावर चित्रित झालेल्या गाण्यांची काही कमी नाही. त्यामुळे या लग्नात आलिया तिच्याच चित्रपटातील गाण्यावर नृत्य करणार अशी सर्वाची अपेक्षा होती. पण आलियाने मात्र अर्जुन कपूर याच्या ‘मुबारकान’ चित्रपटातील हवा हवा या गाण्यावर ताल धरण्याचं नक्की केलंय. त्यामुळे चाहत्यांचा थोडा हिरमोड झाला असला तरी आलिया आपल्या नृत्याने सर्वाची नाखुशी दूर करेल हे नक्की. -मसक्कली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 5:32 am

Web Title: aliya bhat dance on arjun kapoor taal
Next Stories
1 सलमान- कतरिनाच्या ब्रेकअपचा ‘या’ अभिनेत्रीला झाला सर्वाधिक फायदा
2 शब्दांच्या पलिकडले : …कभी अलविदा ना कहना
3 ‘शेप ऑफ वॉटर’ला ऑस्करची १३ नामांकने
Just Now!
X