News Flash

Video : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..

व्हिडीओत बोलताना अलका कुबल झाल्या भावूक

अलका कुबल

‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या सेटवर २२ जण करोना पॉझिटिव्ह आढळले. या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे करोनामुळे निधन झाले. याच मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल या आशालता यांच्यासोबतच होत्या. अलका कुबल यांनाही करोनाची लागण झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. या सर्व विषयांबाबत अलका कुबल यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला.

अलका कुबल व्हिडीओमध्ये काय म्हणाल्या?

“‘आई माझी काळूबाई’ मालिकेच्या सेटवर २२ जण करोना पॉझिटिव्ह आढळले. ते सर्वजण आता ठीक आहेत, फिट आहेत. पण ज्येष्ठ अभिनेत्री आशालता, ज्या मला आईसमान होत्या, त्यांचं निधन झालं. आम्ही सगळ्यांनी त्यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. साताऱ्याला प्रतिभा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. चार दिवस मी त्यांच्यासोबत होते, म्हणून अशाही अफवा पसरल्या होत्या की मलाही करोनाची लागण झाली. मला तर किती जणांनी एफबीवर श्रद्धांजलीसुद्धा वाहिली. तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की, रसिकप्रेक्षकहो तुम्ही आमच्यावर खूप प्रेम केलंत. मी ठीक आहे आणि आमचं युनिट पुन्हा एकदा शूटिंगसाठी सज्ज झालंय. सर्वांचे रिपोर्ट करोना निगेटिव्ह आले आहेत. तुमचा पाठिंबा असाच राहू द्या”, असं त्या या व्हिडीओत म्हणाल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alka Kubal Athalye (@alkakubal_23) on

आशालता या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या शूटिंगसाठी साताऱ्यात गेल्या होत्या. याच ठिकाणी त्यांना करोनाची लागण झाल्याने अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 1:01 pm

Web Title: alka kubal on her corona positive rumors and ashalata wabgaonkar death ssv 92
Next Stories
1 बॉलिवूडला पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्रीने केली ड्रग्ज टेस्ट; रिपोर्ट होतोय व्हायरल…
2 फिल्म इंडस्ट्रीत घराणेशाही शक्यच नाही- जावेद अख्तर
3 सौंदर्याने घायाळ करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात होते यश चोप्रा
Just Now!
X