28 September 2020

News Flash

आई काळूबाईंच्या भूमिकेत अलका कुबल

काळूबाईच्या नावानं चांगभलं...

‘धुरळा’ या चित्रपटात दमदार भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्री अलका कुबल एका मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकेचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यामध्ये अलका कुबल देवी काळूबाईच्या रुपात दिसत आहेत. ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’ असं लिहित अलका यांनी हा टीझर इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका लवकरच सुरू होणार आहे.

‘आई माझी काळूबाई’ असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेचं कथानक आणि त्यातील इतर भूमिका यांविषयी अद्याप निर्मात्यांनी कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. मात्र टीझरमधील अलका कुबल यांचा लूक पाहून प्रेक्षकांमध्ये मालिकेविषयी फार उत्सुकता निर्माण झाली आहे. अलका यांनी याआधीही पौराणिक कथानक असलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेलाही प्रेक्षक डोक्यावर उचलून घेतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा : नवाजुद्दीन अन् भावात वादाची ठिणगी; भावाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अलका कुबल सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबतच प्राजक्ता माळी, प्रसाद ओक, मकरंद अनासपुरे आणि महेश कोठारे हेसुद्धा परीक्षक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2020 12:49 pm

Web Title: alka kubal to play a mythological character in the upcoming show aai mazi kalubai ssv 92
Next Stories
1 अभिषेक बच्चनमुळे करणने होळी खेळणे केले कायमचे बंद, कारण…
2 नवाजुद्दीन अन् भावात वादाची ठिणगी; भावाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
3 Video : शिल्पा शेट्टीने दिल्या बिग बींच्या स्टाइलमध्ये होळीच्या शुभेच्छा
Just Now!
X