News Flash

अलका कुबल पुन्हा दिसणार काळूबाईच्या भूमिकेत

मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने अनेकांच्या मनावर जादू करणारी अभिनेत्री अलका कुबल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या सोनी वाहिनीवरील ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत अतिशय महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आल्यामुळे चाहत्यांमध्ये मालिकेबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमोमध्ये अलका कुबल मालिकेमध्ये काळूबाईच्या भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि अभिनेते शरद पोंगसे हे देखील भूमिका साकारणार असल्याचे दिसत आहे.

अलका यांनी याआधीही पौराणिक कथानक असलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. त्यामुळे त्यांच्या या आताच्या भूमिकेलाही प्रेक्षक डोक्यावर उचलून घेतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी अलका यांनी ‘धुरळा’ या चित्रपटात दमदार भूमिका साकारली होती. तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. त्यांच्यासोबतच प्राजक्ता माळी, प्रसाद ओक, मकरंद अनासपुरे आणि महेश कोठारे हे सुद्धा परीक्षक होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 5:16 pm

Web Title: alka kubal upcoming serial aai mjhi kalubai avb 95
Next Stories
1 सुशांत आत्महत्या प्रकरण: पार्थ पवारांनी केली गृहमंत्र्यांकडे CBI चौकशीची मागणी
2 ‘चार दिवस सासूचे’ पुन्हा एकदा..
3 रस्त्यावर भाजी विकतोय हा अभिनेता, अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’मध्ये केले आहे काम
Just Now!
X