05 March 2021

News Flash

…म्हणून अल्का याज्ञिकने आमिरला खोलीबाहेर काढले

त्याक्षणी मला प्रचंड लाज वाटली

गायिका अलका याज्ञिक

बॉलिवूड गायिका अल्का याज्ञिक नुकत्याच ‘माय लाइफ, माय स्टोरी’ या कार्यक्रमात गेल्या होत्या. गाण्याशी संबंधित आठवणींना उजाळा देत असताना आमिरसोबत घडलेला एक जबरदस्त किस्सा त्यांनी सांगितला. ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमाच्या चित्रीकरणावेळचा एक प्रसंग सांगितला. या सिनेमातील ‘गजब का है दिन..’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळी अल्का याज्ञिक यांनी आमिर खानला चक्क खोलीबाहेर काढले होते.

आमिर खानला खोली बाहेर काढण्याएवढं नक्की काय झालं होतं? असा प्रश्न आता अनेकांना पडला असेल. अल्का याज्ञिकने आमिर खानचा कयामत से कयामत तक या पहिल्या सिनेमासाठी अनेक गाणी गायली. ‘माय लाइफ, माय स्टोरी’ या कार्यक्रमात सेलिब्रेटी आपल्या आयुष्यातील अनेक किस्से सांगतात.

आमिरचा किस्सा सांगताना त्या म्हणाल्या की, “मी कयामत से कयामत तक या सिनेमातील गजब का है दिन या गाण्याचे रेकॉर्डिंग करत होते. तेव्हा माझ्या रेकॉर्डिंगच्या खोलीत एक देखणा मुलगा बसला होता. सुरुवातीला तर मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि माझा गाण्याचा सराव करत राहिले. पण गाणे रेकॉर्ड करण्याची वेळ आली तेव्हा मी खूप अस्वस्थ झाले. तुम्ही गात असताना कोणीतरी तुमच्याकडे एकटक पाहात आहे असं तुम्हाला जाणवलं तर तुम्ही अस्वस्थ होता. त्यामुळे मी त्याला त्या खोलीच्या बाहेर जायला सांगितले. तो सुद्धा काहीही न बोलता तिथून निघून गेला.

गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यानंतर दिग्दर्शक मन्सूर खान यांनी या सिनेमातील नायकाशी माझी ओळख करून दिली. त्याक्षणी मला प्रचंड लाज वाटली. कारण याच नायकाला मी काही वेळापूर्वी खोलीच्या बाहेर काढलं होतं. त्यानंतर आजपर्यंत आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो, तेव्हा आमिर मला त्या गोष्टीची आठवण करून देतो आणि आम्ही दोघेही त्यावर जोरजोरात हसतो.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 6:57 pm

Web Title: alka yagnik says aamir khan to go out of room
Next Stories
1 Happy Birthday Jitendra: ‘ग्रीटींग’मधून बालमित्र जागवणार ‘डेटींग’च्या आठवणी
2 ..या नावाने सुरु होणार शाहरुखचे नवे हॉटेल
3 Baahubali 2 Hindi jukebox out: ‘बाहुबली’ हिट गाणी फ्लॉप!
Just Now!
X