News Flash

अनवट साय-फायपट!

देव आणि दानव या दोन विरुद्ध प्रवृत्तींचा या वेबपटात वेगळ्या पद्धतीने विचार करण्यात आला आहे

रेश्मा राईकवार

आयुष्याची क्षणभंगुरता एकाच वेळी स्पष्टपणे समोर ठेवायची आणि आयुष्य क्षणभंगुर आहे हे मान्य करून सचोटीने, आनंदाने मार्गक्रमण करत पुढे जात राहायचं, हे जगण्याचं सार कोणाच्याही गळी उतरवणं सोपं नाही. पण आजवर ज्या विषयाला चित्रपटांमधून छेडण्याचं फारसं धाडस के लं जात नाही, असा विषय साय-फायपटाच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवण्याचं काम तरुण लेखिका-दिग्दर्शिका आरती कडावने ‘कार्गो’ या वेबपटातून के लं आहे. ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेला हा वेबपट त्याच्या विषय आणि मांडणीमुळे निश्चितच वेगळा ठरतो.

देव आणि दानव या दोन विरुद्ध प्रवृत्तींचा या वेबपटात वेगळ्या पद्धतीने विचार करण्यात आला आहे. माणूस मेल्यानंतर रेडय़ावर बसून यमराज येतो आणि तो त्या आत्म्याला वर घेऊन जातो. मग वरती चित्रगुप्त त्या त्या व्यक्तीच्या पाप-पुण्याचा हिशोब मांडून त्याला स्वर्गात देवांकडे पाठवायचं की नरकात दानवांक डे पाठवायचं हे ठरवलं जातं, अशी पुराणकथा आपल्याकडे प्रचलित आहे. इथं या चित्रपटात स्वर्ग आणि नरक अशा दोन वेगवेगळ्या संकल्पना नाहीत. कारण मुळात देव आणि दानव किं वा राक्षस वेगळे राहिलेले नाहीत. ‘कार्गो’ या वेबपटाच्या सुरुवातीलाच देव आणि राक्षसांमध्ये एक शांतता करार झाला असल्याचे लेखिका सांगते. त्यामुळे पृथ्वीवर ज्यांच्याकडे काही तरी अचाट, अनैसर्गिक शक्ती आहेत ते साहजिकच माणसासारखे असले तरी ते दानव आहेत. आणि दानव असले तरी ते वृत्तीने माणसासारखेच आहेत. पुष्पक ३६४-ए या अंतराळयानात प्रहस्थ हा दानव गेली ७५ वर्ष काम करतो आहे. पृथ्वीवर कु ठल्याही कारणाने निधन झालेले जीव या यानात येतात. यानात आल्यानंतर या सगळ्या लोकांच्या स्मृती पुसल्या जातात, त्यांच्या जखमा दूर के ल्या जातात आणि त्यांना दुसऱ्या जन्मात जगण्यासाठी पाठवले जाते. ७५ वर्ष एकटेपणाने या अंतराळयानात हेच काम करत आलेला प्रहस्थ पृथ्वीवरच्या मोजून दोन ते तीन माणसांशी यंत्राद्वारे संपर्कात आहे. कु ठल्याही भावनेच्या आहारी न जाता त्रयस्थपणे काम करणाऱ्या प्रहस्थच्या आयुष्यात गोंधळ तेव्हा उडतो जेव्हा त्याच्याबरोबर युविष्का नावाची तरुण सहकारी काम करण्यासाठी अंतराळयानात दाखल होते.

प्रहस्थ आणि युविका या दोघांच्या संवेदना वेगळ्या आहेत. त्यांच्या स्वभावात, जाणीव-नेणिवेत असलेला फरक आणि त्यामुळे एरवी यांत्रिक वाटणाऱ्या प्रक्रियेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन याचा योग्य पद्धतीने वापर करत आरती कडाव यांनी आपला विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. दर वेळी अंतराळयानात दाखल होताना प्रत्येक जीवाची मरण्यापूर्वीची कथा आपल्याला पाहायला मिळते. अनेक स्वप्नं, जबाबदाऱ्या, काळज्या किं वा काहीच नाही तर सहज चालत लिफ्टमध्ये शिरावं आणि थेट दार उघडून यानात यावं अशा कित्येक वृत्ती-प्रवृत्ती घेऊन हे जीव दाखल होतात. या प्रसंगांमधून माणसाचं क्षणभंगुर जीवन दिग्दर्शिको ठळकपणे आपल्यासमोर ठेवते. ही क्षणभंगुरता के वळ माणसाच्या जीवन-मरणाची नाही, तर जगताना माणूस कोणता हेतू घेऊन जगत असतो. आणि जेव्हा तो मरतो तेव्हा एका क्षणात त्याच्या जगण्याचा हेतूही संपून जातो का? त्याच्या मागे त्याने करावं असं काही उरतच नाही का, असे प्रश्न लेखिके ने उपस्थित के ले आहेत. मात्र तरीही या प्रश्नांची मांडणी करत दिग्दर्शिका पाहणाऱ्याला निराश करत नाही. देव आणि दानवांच्या या एकत्रित येण्यामुळे माणूस मेल्यानंतर तो कु ठल्या प्रवृत्तीच्या विश्वात खितपत पडणार, हा प्रश्नच शिल्लक राहत नाही. एक जन्म संपवून माणूस दुसऱ्या जन्मात जातो. जन्म-मृत्यूचे हे वर्तुळ काय ते ठाम आहे आणि ते तसेच चालू राहणार. तुम्ही ज्या क्षणात आहात तो सचोटीने जगा, अशी काहीशी तात्त्विक मांडणी दिग्दर्शिके ने या ‘कार्गो’मधून के ली आहे. विक्रम मसीसारखा उत्तम अभिनेता यात प्रहस्थच्या भूमिके त आहे, तर युविष्काची भूमिका श्वेता त्रिपाठी या अभिनेत्रीने के ली आहे. या दोघांनीही खूप सहजतेने या भूमिका रंगवल्या आहेत. या दोघांबरोबर आणखी एक टीव्हीसारख्या छोटय़ा यंत्रातून डोकावणारा एक चेहरा आपल्याला आणि खास मराठी प्रेक्षकांना सुखावून जातो तो म्हणजे अभिनेता नंदू माधव यांचा. के वळ चेहऱ्यावरील हावभावांच्या जोरावर आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याची किमया नंदू माधव यांनी के ली आहे. मोजके  कलाकार आणि प्रभावी कथेला उच्च निर्मितिमूल्यांची जोड देत बनवलेला हा वेबपट सध्या इतर वेबमालिका आणि चित्रपटांमध्ये उजवा ठरतो.

कार्गो

दिग्दर्शक – आरती कडाव

कलाकार – विक्रांत मसी, श्वेता त्रिपाठी, नंदू माधव.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 1:11 am

Web Title: all about the netflix movie cargo zws 70
Next Stories
1 सध्या घरोघर बिग बॉसचाच खेळ!
2 सुशांतसोबत असलेल्या नात्यावर साराने दिली कबुली?
3 वेगळ्या लूकमुळे ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याला ओळखणं ही झालं कठिण
Just Now!
X